Rain in Maharashtra | कृष्णा, भीमा खोर्‍यातील धरण परिसरात दमदार पाऊस ! पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्राला दिलासा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rain in Maharashtra | कोकणाला झोडपून काढणार्‍या पावसाने घाट ओलांडून आता पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार वर्षाव (Rain in Maharashtra) करण्यास सुरुवात केली आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर (Sahyadri Ghatmatha) अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत असल्याने तळाला गेलेल्या धरणाच्या पाणीसाठ्यात (Dam Water Storage) वेगाने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांबरोबर शहरी नागरिकांना दिलासा मिळू लागला आहे.

 

पुणे जिल्ह्यातील वडीवळे धरण (Wadivale Dam) क्षेत्रात गेल्या 24 तासात 99 मिलीमीटर पावसाची बरसात झाली आहे. या हंगामातील हा सर्वाधिक पाऊस आहे. त्याचप्रमाणे पवना धरण (Pavana Dam) क्षेत्रात 98 मिमी पावसाची नोंद झाली आहे. (Rain in Maharashtra)

 

पुणे शहराला पाणी पुरवठा (Pune City Water Supply) करणार्‍या खडकवासला प्रकल्पातील (Khadakwasla Project) पाणी साठा 3.67 टीएमसी इतका झाला आहे. पुणे शहरात बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत 23 मिमी पावसाची नोंद झाली आहे. लोणावळा येथे या हंगामातील सर्वाधिक 184 मिमी इतका मुसळधार पाऊस झाला आहे. लवासा 168 मिमी, गिरीवन – 82, भोर 62, चिंचवड 54, पाषाण 21, लवळे 31 मिमी पावसाची नोंद झाली होती. जिल्ह्यात अन्यत्र हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली आहे.

पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात गेल्या २४ तासात पडलेला पाऊस (मिमी)

वरसगाव (Varasgaon) – ७०

टेमघर (Temghar)- ६५

पानशेत (Panshet) – ६८

खडकवासला – १८

गुंजवणी (Gunjavani) – ५९

माणिकडोह (Manikdoh) – २०

येडगाव (Yedgaon) – ५़

वडज (Vadaj) – ३

डिंभे (Dimbhe) – ८

घोड – ६

विसापूर (Visapur) – ०

चिल्हेवाडी (Chilhewadi) – ९

कळमोडी (Kalmodi) -१९

भामा आसखेड (Bhama Askhed) – २२

वडीवळे – ९९

आंद्रा (Andhra) – ४०

पवना – ९८

कासारसाई (Kasarasai) – ४१

मुळशी – ६०

निरा देवधर (Nira Deodhar) – ४३

भाटघर (Bhatghar) – २४

वीर (Veer) – २़

नाझरे – २

उजनी (Ujani) – ४ मिमी

 

कृष्णा खोर्‍यातही पावसाने जोरदार आगमन
खोर्‍यातही (Krishna Valley) पावसाने जोरदार आगमन केले आहे. महाबळेश्वरजवळील (Mahabaleshwar) नवजा येथे या हंगामातील सर्वाधिक 244 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच महाबळेश्वर येथे 197, पाटगाव धरण क्षेत्रात 224 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

 

कृष्णा खोर्‍यातील धरणाच्या परिसरात गेल्या २४ तासात पडलेला पाऊस (मिमी)

कोयना (Koyna) -१५६

दुधगंगा (Dudhganga) – ९४

वारणावती (Varanavati) – ९५

राधानगरी(Radhanagari) – ११५

तुळशी (Tulsi) – १३६

पाटगाव (Patgaon) – २२४

धोम बलकवडी (Dhom Balkavadi) – ७६

उरमोडी (Urmodi) – ४२

तारळी (Tarli) – ८०

 

 

Web Title :- Pune News | GPA celebrates ‘Doctor’s Day’ with enthusiasm! Awarded ‘GP Doctor of the Year’ award to Dr. Vijay Patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Former Mumbai CP Sanjay Pandey | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे चौकशीसाठी ‘कॅब’ने ED कार्यालयात

Pune PMC News | निविदा मंजुरीनंतर 6 महिन्यांत वर्क ऑर्डर न दिल्यास खातेप्रमुखांवर कारवाई; महापालिका आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार यांचा आदेश

 

Pune Crime | सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधवसह साथिदारांवर मोक्का, नारायणगावातील व्यावसायिकाकडे खंडणी प्रकरणात कारवाई