Rain in Maharashtra | राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; पुण्यासह ‘या’ 18 जिल्ह्यांना हाय अलर्ट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Rain in Maharashtra | मागील पाच दिवसांपासुन राज्याला पावसानं चांगलंच झोडपुन काढलं आहे. आज (मंगळवार) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडुन (Indian Meteorological Department) देण्यात आला आहे. तसेच, विदर्भात मध्यम ते मुसळधार पावसाची (Rain in Maharashtra) शक्यता वर्तवली आहे. कोकणात आज अनेक भागात तीव्र मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. म्हणुन, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी परिसरातील नागरिकांनी अलर्ट राहण्याचा इशारा देखील हवामान खात्याकडुन (Indian Meteorological Department) देण्यात आला आहे.

आज सकाळपासूनच मुंबईसह (Mumbai) कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra), उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra) आणि मराठवाड्यात (Marathwada) ढगाळ हवामानाची नोंद केली गेली. आगामी काही तासांत अनेक भागात जोरदार पावसाची
हजेरी लागण्याची शक्यता आहे.
तसेच, आज राज्यात एकूण 16 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange alert to 16 districts) जारी केला आहे.
तसेच, रत्नागिरी आणि रायगड या 2 जिल्ह्यांत रेड अलर्ट (Red alert) दिलाय.
त्यामुळे या 2 जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे.
आगामी काही तासामध्ये या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरात पाऊस कोसळणार आहे.

 

‘या’ जिल्ह्यांना ‘Orange alert’ –

पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, परभणी, नांदेड, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांना हवामान खात्यानं आज ऑरेंज अलर्ट
जारी करण्यात आला आहे.
तसेच, उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

सध्या मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला असून, बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रापर्यंत सक्रिय झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिण भागात परस्पर विरोधी वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्यात सर्वत्र (Rain in Maharashtra) पावसासाठी पोषक हवामान तयार झालं आहे.
दरम्यान, उद्यापासून राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे.
उद्या उत्तर महाराष्ट्र, घाट परिसर आणि कोकणातील काही जिल्हे वगळता राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता आहे.
नंतर आगामी 3 दिवस महाराष्ट्रात हळुहळू पावसाची गती कमी होणार आहे.

 

Web Title : Rain in Maharashtra | heavy rain possible in maharashtra for next 24 hours imd give high alert to 18 districts including pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ajit Pawar | पुण्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना लाजीरवाणी, संतापजनक – अजित पवार

Pravin Gaikwad | ‘मराठा ही बिझनेस कम्युनिटी व्हावी’, प्रवीण गायकवाड यांचे प्रतिपादन

7th Pay Commission | मोदी सरकारकडुन दिवाळी दरम्यान ‘या’ कर्मचाऱ्यांना मिऴु शकते मोठी भेट