×
Homeताज्या बातम्याRain in Maharashtra | राज्यात पावसाचा जोर वाढणार, गणपती विसर्जन मुसळधार पावसात;...

Rain in Maharashtra | राज्यात पावसाचा जोर वाढणार, गणपती विसर्जन मुसळधार पावसात; हवामान खात्यानं नेमकं काय म्हटलं?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rain in Maharashtra | राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) ही शक्यता वर्तवली आहे. ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस (Rain in Maharashtra) पडला होता. यानंतर आता हवामान खात्याने (IMD) पावसाच्या संदर्भात आणखी एक इशारा दिला आहे. आता बाप्पाच्या विसर्जनादरम्यान राज्यात जोरदार पाऊस (Heavy Rain) पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

 

 

हवामान खात्याचे के. एस. होसाळीकर (K.S. Hosalikar) यांनी ट्विट करुन पावसासंदर्भात माहिती देताना सांगितले, की पुढील तीन ते चार दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या किंवा मध्यम गडगडाटासह पाऊस पडण्याची (Rain in Maharashtra) शक्यता आहे. तर पाचव्या दिवसापासून राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

 

 

या जिल्ह्यात वादळी वाऱ्याची शक्यता

हवामान खात्याचे के.एस. होसाळीकर यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये राज्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये कोकण, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, उस्मानाबाद, लातूर, परभणी हिंगोली, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, नाशिक, पुणे, सातारा येथील घाट भागात आज मध्यम स्वरुपाच्या वादळी शक्यता आहे.

 

Web Title :- Rain in Maharashtra | heavy rain will during ganesh visarjan in maharashtra said imd read in detail

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News