Rain in Maharashtra | येत्या 5 दिवसांत मुंबईसह पुण्यात ‘धो-धो’ पाऊस, नंदुरबार वगळता पावसाची राज्यात सर्वदूर बरसणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – राज्यात दडीमारुन बसलेल्या मान्सूनने (Rain in Maharashtra) मागील तीन-चार दिवसांपासून जोरदार कमबॅक (Rain in Maharashtra) केले आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यापासून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसानं जोरदार (heavy rainfall) हजेरी लावली आहे. त्यानंतर आता राजस्थानपासून ते बंगालच्या उपसागरात पर्यंत हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे राज्यात मोसमी वाऱ्यांना गती मिळाली असून पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज (रविवार) उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार हा जिल्हा वगळता राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, हिंगोली आणि नांदेड या पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (IMD give orange alert) जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. तर काही ठिकाणी तीव्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित महाराष्ट्राला मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने यलो अलर्ट (yellow alert) जारी केला आहे.

या जिल्ह्यात जोरदार पाऊस

आज कोकणासह मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर अधिक राहणार आहे. तसेच पुढील पाचही दिवस राज्यात सर्वदूर पावसाची धुव्वाधार बॅटिंग पहायला मिळणार आहे. दरम्यान, पुणे, सांगली, नाशिक, सोलापूर, जळगाव आणि संपूर्ण विदर्भात विजांचा कडकडाट अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा (Alert) दिला आहे.

 

पुण्याला पाऊस झोडपणार

मागील आठवड्यात पुण्यासह मुंबईत रिमझिम आणि हलक्या पावसाच्या सरी पडल्या आहेत.
मात्र आता या दोन्ही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
पुढील पाच दिवस मुंबई आणि पुण्यात (Pune) जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
आज (रविवार) आणि उद्या (सोमवार) मुंबई आणि पुण्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तर 7 आणि 8 सप्टेंबर रोजी दोन्ही जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आहे.
याशिवाय 9 तारखेला मुंबईला यलो तर पुण्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Web Title : Rain in Maharashtra | heavy rainfall possible in mumbai pune for next 5 days today rain hits all maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Dhananjay Munde | सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल, प्रचंड खळबळ

Pune Crime | पुण्यातील 21 वर्षीय तरूणीला आईचं दुसर्‍याशी ‘झेंगाट’ असल्याचं समजलं, ब्रॉयफ्रेन्डच्या मदतीनं केलं असं काही…

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 278 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी