Rain in Maharashtra | राज्यात पुढचे 4 दिवस धुवाँधार, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ‘येलो’ अलर्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rain in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर गेल्या 24 तासापासून थोडी उसंत घेतली आहे. मात्र आता पुन्हा जोरदार पावसाची (Heavy Rain) शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने (IMD) दिली आहे. राज्यात पुढचे चार दिवस पुणे (Pune), सातारा (Satara), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg) या भागात येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. तर नांदेड जिल्ह्यात पुढच्या 24 तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची (Rain in Maharashtra) शक्यता आहे. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट असणार आहे. तर सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता आहे. विदर्भामध्ये 13 आणि 14 ऑगस्ट रोजी पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ही स्थिती झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

राज्यातील पाऊस (Rain in Maharashtra) कमी झाला असून केवळ काही भागांतच हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज IMD ने वर्तवला आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गेल्या 5-6 दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली होती.

 

बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता कमी झाली आहे.
तर सौराष्ट्र ते केरळच्या किनारपट्टीपर्यंत द्रोणीय स्थिती आहे. याचा प्रभाव केवळ किनारपट्टीच्या भागात आहे.
त्यामुळे राज्यातील पाऊस कमी झाला आहे. राज्यात रायगड, रत्नागिरी, पुणे (घाटमाथा), सातार (घाटमाथा), वर्धा, भंडारा,
गडचिरोली, गोंदिया, नागपूर या भागांसाठी हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे.

 

Web Title : – Rain In Maharashtra | heavy rainfall warnings by imd during coming 5 days in maharashtra rain alert news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा