Rain in Maharashtra | आगामी 5 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rain in Maharashtra । राज्यात पावसाने (Rain) जोर धरला असून, सर्वत्र जलमय वातावरण झालं आहे. तर, महाराष्ट्रात अनेक भागात आगामी पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून (Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे. आगामी पाच दिवस कोकण (Konkan) आणि मध्य महाराष्ट्रातील (Central Maharashtra) घाट माथ्यावर मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर, 30 जुलै आणि 31 जुलै रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange alert) देखील दिला आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रातल्या घाट माथ्यावर काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज मुंबई हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

Rain in Maharashtra | heavy rains likely over kokan and ghats in madhya maharashtra for next five days

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यात पुढील 24 तासात याची तीव्रता आणखी वाढणार आहे. म्हणून अरबी समुद्रातील बाष्प पूर्व भागात खेचले जाणार आहे. यावरून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 30 जुलै आणि 31 जुलै रोजी ह्या भागांसाठी ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी केला आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. 30 आणि 31 जुलै रोजी घाट माथ्यांकरीत ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी केला आहे. येथे 70 ते 200
मिमीपर्यंतच्या पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून (Meteorological Department) सांगण्यात आलं आहे.

हवामान विभागाकडून (Meteorological Department) जिथे पावसाची शक्यता आहे तिथे
नागरीकांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. या दरम्यान, मुंबई आणि
उपनगरात आगामी 3 दिवस हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर 30 आणि 31
जुलै रोजी मुंबई आणि उपनगरात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच,
मराठवाडा, विदर्भात आगामी 5 दिवस काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता
हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हे देखील वाचा

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 189 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Amravati Crime | अमरावतीत ‘हवाला’कांड ! 2 चारचाकी वाहनांमधील 3 कोटी 50 लाखांची रोकड जप्त, 4 गुजराती व्यक्ती ताब्यात

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Rain in Maharashtra | heavy rains likely over kokan and ghats in madhya maharashtra for next five days

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update