Rain in Maharashtra | राज्यात 9 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rain in Maharashtra | राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात येत्या ९ सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस (Rain in Maharashtra) पडण्याची शक्यता आहे. या पावसाचा प्रभाव मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात राहणार असून, ७ आणि ८ सप्टेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता अधिक राहणार आहे.

आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा आणि रत्नागिरीचा समावेश आहे. आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलेल्या जिल्ह्यात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि अकोल्याचा समावेश आहे, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी बरसत असून आजही कमी अधिक फरकाने हीच परिस्थिती राहील, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली.

हे देखील वाचा

Post Office | फायद्याची गोष्ट ! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये दरमहा होते कमाई, द्यावा लागत नाही टीडीएस; ‘इतकी’ करावी लागेल गुंतवणूक, जाणून घ्या

EPFO | ‘पीएफ’वर 8.5 टक्के व्याजाची मिळाली मंजूरी, दिवाळीपूर्वी मिळू शकते रक्कम; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Rain in Maharashtra | heavy very heavy showers will fall state week

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update