Rain in Maharashtra | मुंबई अन् पुण्यासह ‘या’ 11 जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्हयाला रेड अलर्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rain in Maharashtra | महाराष्ट्रात मागील पाच ते सहा दिवस पाऊसाने धो-धो केलं आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने रुद्रावतार धारण केलं आहे. यामुळे अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने राज्याला (Rain in Maharashtra) झोडपुन काढलं आहे. याचप्रमाणे आता आज (बुधवारी) राज्यातील 11 जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडुन (Indian Meteorological Department) वर्तवण्यात आला आहे. तसेच, मुंबई, ठाणे, पुण्यासह 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange alert) देण्यात आला आहे. तर पालघरला रेड अलर्ट (Red alert) जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या (Indian Meteorological Department) अंदाजानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची रिपरिप दिसत आहे.

मुंबई, ठाणे, पुण्यासह किनारपट्टी लगतच्या भागाला ऑरेंज अलर्टचा (Orange alert) इशारा देण्यात आला आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट (Red alert) जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात (Rain in Maharashtra) पावसाने अधिक वेग घेतला आहे. त्यामुळे आज अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने (Indian Meteorological Department) दिला आहे.

Gold Price Today | सोने-चांदीच्या किमतीत बदल, जाणून घ्या आज किती स्वस्त मिळतेय 10 ग्राम सोने?

पालघर (Palghar) जिल्ह्यात गडगडाटासह अतिमुळधार ते अतिवृष्टीसदृश्य पाऊस होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने पालघर जिल्ह्याला रेड अलर्टचा (Red alert) इशारा जारी केला आहे. त्याचबरोबर
राज्याच्या अन्य भागांत पाऊस उसंत घेणार असून, जळगाव, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला या
जिल्ह्यात देखील आजही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाकडुन जिल्ह्यांना यलो अलर्ट (Yellow alert) देण्यात आला आहे.

दरम्यान, काल राज्याला पावसाचा (Rain in Maharashtra) तडाखा बसला आहे. पावसाच्या दमदार बॅटींगने शेतक-याची चिंता वाढली आहे. कारण ठिकाणी वाजळी पावसामुळे अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. काल मुंबईसह कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस झाला. अति वेगवान वादळी पावसाने अनेक नद्या, नाले, ओढे तु़ुडुंब भरले आहे.

हे देखील वाचा

Pune Crime | ‘तुझ्यामुळे माझी जिंदगी बरबाद झाली तुझा गेमच करतो’ ! मारहाण होत असताना मदत न केल्याने तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

Navi Mumbai Crime | 80 वर्षाच्या वृद्धाचा ‘डर्टी पिक्चर’ !10 हजार रुपये देऊन युवकाच्या पत्नीसोबत झोपण्याची केली मागणी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Rain in Maharashtra | imd rain alert for maharashtra heavy to heavy rain prediction in maharashtra mumbai thane pune red alert for palghar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update