Rain in Maharashtra | …म्हणून मुंबईसह राज्यात पावसाचा जोर वाढणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात (bay of Bengal) निर्माण झालं आहे. त्यामुळे मागील आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी पावसाची (Rain in Maharashtra) जोरदार हजेरी (heavy rainfall in maharashtra) लावली आहे. मराठवाडा आणि पूर्व विदर्भात जोरदार पाऊस कोसळल्यानंतर आता या ठिकाणी पावसानं उघडीप घेतली आहे. परंतु कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि घाट परिसरात पावसाचा (Rain in Maharashtra) जोर कमी अधिक प्रमाणात कायम आहे. आजही राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

48 तासात कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होणार
येत्या 48 तासात बंगालच्या उपसागरातील हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रात येत्या तीन चार दिवसांत पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा (heavy rain) देण्यात आला आहे. कोकणातील जिल्ह्यत याचा सर्वाधिक धोका असल्याचे हवामान खात्याकडून (IMD) सांगण्यात आलं आहे. त्यामुळे कोकणात आणि किनारपट्टी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

या परिसरात पावसाचा जोर वाढणार
शनिवार मुंबईत दिवसभर संततधार होती. तर तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.
यानंतर आता सोमवार आणि मंगळवारी पालघर (Palghar) आणि ठाणे (Thane) परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
तर आज रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे आणि सातारा या पाच जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी केला आहे.
याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

Web Titel :- Rain in Maharashtra | intense low pressure area in bay of bengal heavy rains will hit state including mumbai rm

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | ‘त्यांनी’ पोलिसांना ‘बोलावले’ अन्पो लिसांनीच घातल्या ‘बेड्या’ ! ‘मानवाधिकार’च्या 7 पदाधिकार्‍यांना पोलिसांनी का केली अटक? जाणून घ्या सविस्तर

Pune Crime | ‘गुप्ता’ व ‘गाडा’ बिल्डरशी संगनमत करुन जागा बळकाविण्यास ‘मदत’; पुणे ‘महापालिका’, हवेलीच्या ‘भूमि अभिलेखा’च्या ‘त्या’ अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल

Pune News | काँग्रेसच्या माजी आमदाराची BJP वर टीका, मोहन जोशी म्हणाले – ‘मोठे प्रकल्प राबविण्यात भाजपला अपयश’