Rain In Maharashtra | मान्सून ‘या’ तारखेला घेणार निरोप, 6 जिल्ह्यांवर अस्मानी संकट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rain In Maharashtra | संपूर्ण राज्यात परतीच्या पावसाने हैराण केले आहे. दिवाळी आली तरी मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत असल्याने शेतकर्‍यांसह सर्वसामान्य देखील हवालदिल आहेत. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार परतीचा पाऊस आता ओसरणार असून दिवाळीत पावसाचे (Rain In Maharashtra) संकट टळणार आहे. मात्र काही भागांत पावसाचा मुक्काम राहणार आहे.

 

हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे (Meteorologist Ramchandra Sable) यांनी म्हटले आहे की, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये 10 मिमी पाऊसाची शक्यता आहे. तसेच, इतर भागांत पाऊस (Rain) निरोप घेईल. पावसाचा मुक्काम वाढल्याने सर्वांनाच त्याचा फटका बसत आहे.

 

सायंकाळी पाऊस (Rain In Maharashtra) पडत असल्याने त्याचा दिवाळी खरेदीवर परिणाम होत आहे. यामुळे व्यापारी देखील हवालदिल होत आहेत. येत्या दोन दिवसात परतीचा पाऊस ओसरायला सुरवात होईल. परतुं राज्यातील काही भागात पावसाची स्थिती कायम राहणार असल्याने काही नागरिकांना पावसातच दिवाळी साजरी करावी लागणार आहे.

सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर व तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी परतीचा पाऊस अजून दोन ते तीन दिवस राहणार आहे.
तर इतर ठिकाणी परतीचा पाऊस ओसरणार आहे. परतीचा पाऊस राज्यातून 25 ऑक्टोबर पासून निरोप घेणार आहे.

 

Web Title :- Rain In Maharashtra | maharashtra rain alert heavy rain in solapur satara kolhapur and konkan weather report today

 

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Gold Rate Today | ‘सुवर्ण’संधी! दिवाळीत खरेदी करा स्वस्त दरात सोने-चांदी, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Eknath Khadse | फोन टॅपिंग प्रकरण : रश्मी शुक्ला यांची सुटका झाल्यावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया, म्हणाले- ‘अलीकडच्या काळात…’

Pune Crime | न्यायालयाने फटकारल्यानंतर हडपसर पोलिसांनी बलात्कार प्रकरणी दाखल केला गुन्हा

Pune ACB Trap | कोंढवा पोलिस ठाण्यातील महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकासह कर्मचारी 50 हजारच्या लाचप्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘जाळयात’, प्रचंड खळबळ