Rain in Maharashtra | मुंबई, पुण्यासह राज्यात मुसळधार पाऊस, पुढील 8 दिवस ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rain in Maharashtra | जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात मान्सून (Monsoon) सक्रिय झाला. राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Rain in Maharashtra) पडल्याने धरणातील पाणी साठा वाढला आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मध्यंतरी विश्रांती घेतल्यानंतर पाऊस पुन्हा जोर धरणार आहे. कोकणातील (Konkan) रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri) या जिल्ह्यांसह कोल्हापूर (Kolhapur), नाशिक (Nashik), पुणे (Pune), सातारा (Satara) या जिल्ह्यांतील घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाच्या सरी बरसणार असल्याची माहिती हवामान खात्याने (IMD) दिली आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या बहुतांश भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

राज्यात पावसाने तीन आठवड्यांहून अधिक काळ उघडीप दिली. पुन्हा कडक उन्हाचा तडाखा जणवू लागला होता. बुधवारपासून राज्यात पुन्हा पावसाचे (Rain in Maharashtra) आगमन झाले आहे. अर्थात मध्य-पूर्व बंगालच्या उपसागरापासून ते आंध्र प्रदेशपर्यंत चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. तसेच बंगालच्या उपसागरातील उत्तर पश्चिम भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या पट्ट्याची तीव्रता आणखी वाढणार आहे. त्यामुळे राज्यात पाऊस वाढणार आहे.

 

पुढील पाच दिवस या जिल्ह्यांना अलर्ट

येलो अलर्ट (Yellow Alert) – पालघर, ठाणे, मुंबई, धुळे नंदूरबार, जळगाव, नांदेड, नगर पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, बुलडाणा, गोंदिया, वर्धा वाशीम, यवतमाळ.

 

ऑरेंज अलर्ट (Orange Alert) – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये 5 ते 8 ऑगस्ट दरम्यान ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

 

11 ऑगस्टपर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस
राज्यात 11 ऑगस्टपर्यंत सर्वदूर पाऊस असल्याचे सांगण्यात आले आहे. कोकण, गोवा, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
तर मुंबईत 7-8 ऑगस्टला मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यातील सोलापूर, यवतमाळ, जालना, धुळे या जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे.

 

Web Title :- Rain in Maharashtra | maharashtra rain update heavy rain in maharashtra mumbai pune