Rain in Maharashtra | ’या’ जिल्ह्यांत पावसाची तीव्रता वाढणार, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rain in Maharashtra | मान्सून (Monsoon) सक्रिय झाल्याने राज्यात पुढील चार ते पाच दिवस काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसांची (Heavy Rain) शक्यता भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) वर्तवली आहे. कोकणातील जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. 12 सप्टेंबरपासून मुंबई (Mumbai), ठाण्यासह (Thane) कोकण (Konkan) भागात पावसाची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता आहे. उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे. घाट भागातही मुसळधार पाऊस पडू शकतो. (Rain in Maharashtra)

 

 

संपूर्ण राज्यात ’यलो अलर्ट’

राज्यातील बहुतांश भागात पावसाचा येलो (Yellow Alert) आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे परिसरात पावसामुळे लोकांची तारांबळ उडाली. तसेच पुणे (Pune), नाशिक (Nashik), अहमदनगर (Ahmednagar) या भागातही पावसाचा कहर सुरू आहे. आजही हवामान विभागाकडून (IMD) राज्यात पावासाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने संपूर्ण राज्यात पावसाचा ’यलो अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. (Rain in Maharashtra)

 

 

बंगालच्या उपसागरात उत्तरेकडील भागावर कमी हवेचे दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे.
कोकण, मराठवाडा (Marathwada) व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातून नैऋत्येकडून
तर विदर्भात आग्नेयेकडून वार्‍याची दिशा आहे.
मान्सूनची नैऋत्येकडील व बंगालच्या उपसागराकडील शाखा सक्रिय झाली आहे.
नैऋत्य मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.
परिणामी या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल.

 

Web Title :- Rain in Maharashtra | monsoon mumbai pune konkan vidarbha imd alert heavy rain

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा