Rain in Maharashtra | राज्यात पुढील 48 तासात मान्सुन पुन्हा सक्रिय होणार, ‘या’ भागात अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rain in Maharashtra | मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी आता पुन्हा पावसाच्या सरी कोसळणार आहेत. येत्या 48 तासात मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय होणार असून राज्यातील अनेक भागांत पाऊस (Rain in Maharashtra) पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवली आहे. उद्यापासून म्हणजे 5 ते 11 ऑगस्ट या कालावधीत राज्यात जोरदार पावसाची (Heavy Rain) शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

 

कोकण (Konkan), गोवा (Goa), घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. येत्या एक ते दोन दिवसांत सिंधुदुर्ग (Sindhudurg), रत्नागिरी (Ratnagiri), रायगड (Raigad) आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पुण्यातही (Pune) मध्यम पावसाची (Rain in Maharashtra) शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

 

मुंबईत 7 आणि 8 ऑगस्टला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात पुन्हा मान्सूनचे पुनरागमन झाल्येच सांगण्यात आले आहे.
तर बंगालच्या उपसागरात येत्या 48 तासात पुन्हा कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्याने विदर्भ मराठवाड्यात देखील
जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती
पुणे वेधशाळेचे संचालक डॉ. अनुपम कश्यपी (Director of Pune Observatory Dr. Anupam Kashyapi) यांनी दिली.

राज्यातील मुंबईसह ठाणे, पुणे, सातारा, धुळे, लातूर परिसरात पाऊस झाला आहे.
येत्या काही दिवसांत राज्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
त्यामुळे नागरिकांनी योग्य ती सतर्कता बाळगावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

 

Web Title :- Rain in Maharashtra | monsoon will be active again in the next 48 hours in the state warning of heavy rain in some parts

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Patra Chawl Scam | संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ईडीने पाठवले समन्स, उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

 

Pune Pimpri Crime | दारुचा ग्लास सांडला म्हणून मित्राचा खून, मृतदेह फेकला कचऱ्यात; हिंजवडी पोलिसांकडून दोघांना अटक

 

Maharashtra Politics | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रकृती बिघडली, तर उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला रवाना; शहा, नड्डा यांची भेट घेण्याची शक्यता