Rain in Maharashtra | राज्यातील 9 जिल्ह्यात ऑरेंज तर मुंबई आणि पुण्यात येलो अलर्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rain in Maharashtra | राज्यात पावसाने कोकण, घाटमाथा आणि विदर्भात थैमान घातले आहे. मागील 24 तासांत कोकणातील रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्याच्या लांजा येथे सर्वाधिक 330 मिमी पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी 200 मिमी पेक्षा जास्त पावसाची (Rain in Maharashtra) नोंद झाली आहे. त्यामुळे नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात (Vidarbha) पावसाने जोरदार बॅटींग केली आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यात (Marathwada) पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून आले.

 

राज्यात पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर या भागात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबार, कोल्हापूर, अकोला, अमरावती, गोंदिया या भागात येलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. तर बुलढाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल पावसाचा (Rain in Maharashtra) जोर कमी झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत घट झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी (दि.9) मुसळधार पाऊस पडला. किनारी भागात वादळी वारे वाहत होते. वाशिष्ठी, जगबुडी, बावनदी, काजळी, अर्जुना नदीची पाणीपातळी कमी झाली असली तरी इशारा पातळीच्या दिशेने नद्या वाहत आहेत.

 

पुणे जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे.
वीर, भामा आसखेड दोन धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माढा तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

 

Web Title : –  Rain In Maharashtra | mumbai pune konkan vidarbha imd alert heavy rain maharashtra rain news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा