Rain in Maharashtra | उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात ऑरेंज तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात यलो अलर्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rain in Maharashtra | गेल्या काही दिवसापासून दडी मारलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. मंगळवारी राज्याच्या अनेक भागात पावसाने जोरदार कमबॅक केले आहे. हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात ऑरेंज तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात यलो अलर्ट (Rain in Maharashtra) जारी केला आहे.

पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली होती. पण पावसास पुन्हा सुरुवात झाल्याने शेतकरी सुखावला आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुफान पाऊस झाला आहे. परभणी, नांदेड, अकोला, वर्धा, भंडाऱ्यामध्ये तुफान पाऊस झाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामान विभागाने राज्यात येत्या ४८ तासात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच मराठवाडा, कोकण, आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गत महिन्यात झालेल्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांना महापुराचा फटका बसला होता. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारपट्टी लगतच्या जिल्ह्यांना तसेच महाड, चिपळूण सारख्या शहरांचे महापुरामुळे मोठे नुकसान झाले होते. कोल्हापूर, सांगलीचा काही भाग पाण्याखाली होता. मराठवाड्यातील आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला होता. मात्र, खान्देश आणि पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुलनेने पाऊस कमी झाला आहे.

हे देखील वाचा

LPG Gas Cylinder Price | घरगुती सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ; 25 रुपये द्यावे लागणार जादा

Pune Crime | पुण्याच्या बोपदेव घाटात प्रेमी युगुलाला लुबाडले; तरुणीवर चाकूने वार करुन केले जखमी

Weather Updates | महाराष्ट्र, छत्तीसगढ आणि MP सह देशाच्या ‘या’ भागांमध्ये कोसळणार जोरदार पाऊस, जाणून घ्या IMD चा ताजा अंदाज

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Rain in Maharashtra | Orange in North Maharashtra, Marathwada and Yellow Alert in Konkan, Central Maharashtra, Vidarbha

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update