Rain in Maharashtra | राज्यात दोन दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rain in Maharashtra | राज्यात गेल्या काही दिवसापासून उन्हाचा चटका लागला आहे. वाढत्या तापमानामुळे गरमी वाढली आहे. दिवसभरात वातावरणात बदल होतानाही दिसत आहे. मात्र आता महाराष्ट्रात जोरदार वादळी पावसाची (Rain in Maharashtra) शक्यता भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department (IMD) वर्तवण्यात आली आहे. येत्या 21 ते 23 एप्रिलपर्यंत राज्यातील अनेक भागात वारा विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत के. एस. होसाळीकर (K S Hosalikar) यांनी दिली. (Chance of heavy rain with thunderstorms)

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत 21 आणि 22 तारखेला विजांच्या कडकडाटासह पाऊस (Rain in Maharashtra) कोसळण्याची शक्यता आहे. तसेच, बुलडाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. 23 तारखेलाही यापैकी काही जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशी माहिती होसाळीकर यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.

महाराष्ट्रात 21 आणि 22 एप्रिल रोजी विदर्भ, मराठवाडा, दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने (Indian Meteorological Department (IMD) वर्तवली आहे. जोरदार पडणाऱ्या अवेळी पावसाचा फटका पिकांना बसू शकतो. तसेच देशातील आसाम आणि मेघालय राज्यात पावसासह गारपीठ होईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

Web Title :- Rain in Maharashtra | Rain in Maharashtra with thunderstorm on 21st and 22nd in Ratnagiri, Sindhudurg, Sangli, Kolhapur, Pune, Solapur, Osmanabad, Latur and Nanded districts


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | गांजा बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारासह 3 जणांना गुन्हे शाखेकडून अटक; 4 लाख 24 हजाराचा मुद्देमाल जप्त

Narayan Rane | ‘हे तीन पक्षांचं सरकार…’; नारायण राणेंनी सांगितला ठाकरे सरकार पडण्याचा नवा मुहूर्त

Lathicharge On Protesters In Katraj Chowk Pune | कात्रज चौकात विविध मागण्यांसाठी आंदोलन करणार्‍यांवर पोलिसांकडून सौम्य लाठीमार

Tata IPL 2022 | …म्हणून आयपीएलचा पुण्यातील ‘हा’ सामना हलवला मुंबईला, वाचा सविस्तर

Pune PMC Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार; शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा

Achalpur Violence Case | अचलपूर हिंसाचार प्रकरणात भाजप शहराध्यक्ष अभय माथनेला पुण्यातून अटक