Rain In Maharashtra | पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस, 9 जिल्ह्यांना IMD कडून हाय अलर्ट
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जुलैमध्ये राज्यात मान्सूनने (Rain in Maharashtra) जोरदार हजरे लावली होती. मात्र, ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यात मान्सूनने राज्यात दडी मारली. परंतु आता राज्यात मान्सून पुन्हा (Rain in Maharashtra) सक्रिय होत आहे. राज्यात मान्सूनसाठी पोषक हवामान तयार होत आहे. मागील चार दिवसात काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी (Rain in Maharashtra) कोसळल्या आहेत. आजही कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD Forecast) वर्तवण्यात आली आहे. पुढील 2 ते 3 दिवसात राज्यात मान्सून सरळीत होण्याची शक्यता आहे. राज्यात आजपासून पुढील चार दिवस राज्यात विविध ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. 19 ऑगस्ट रोजी राज्यात हवामान खात्याकडून कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.
🇮🇳 Severe weather warnings issued by IMD for Mah for 15-19 Aug, 2021.
As on day there is no warning for 19 Aug.
D1 parts of Konkan, Madhy Mah heavy rainfall at isol places.
D2-D4 heavy rainfall & TS warnings in diff districts as shown below.
Pl see IMD website for details. pic.twitter.com/45QxyERfHf— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 15, 2021
‘या’ 9 जिल्ह्यात यलो अलर्ट
आज राज्यात मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या 9 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, याठिकाणी 30 ते 40 किमी प्रतितास वेगानं वारे वाहणार असल्याचेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. राज्यात पुढील चार दिवस हीच परिस्थिती राहणार आहे.
15 Aug 🇮🇳, Moderate to intense intermittent spells of rains over #Mumbai, #Thane #NaviMumbai areas being observed in last 6 hrs at 2.15 pm.
Distribution of rainfall is more towards Thane NM areas.
For details, pl see IMD websites. pic.twitter.com/A5zKQe5RKk— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 15, 2021
उद्या ‘या’ 8 जिल्ह्यात जोरदार पाऊस
उद्या दक्षिण महाराष्ट्रातील (South Maharashtra) काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची (Heavy rain) शक्यता आहे. सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीड नांदेड, हिंगोली आणि परभणी या 8 जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान आकाशात विजांचा गडगडाट अधिक असणार आहे. त्यामुळे विजा कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन हवामान तज्ज्ञांनी केले आहे.