Rain in Maharashtra | परतीच्या पावसाचा जोर कायम, पुढील 4 दिवस कशी असेल स्थिती, राज्यातून पाऊस कधी जाणार?, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rain in Maharashtra | ऑक्टोबर महिन्याच्या मध्यावर आला मात्र अद्याप पावसाने आपला मुक्काम हलवलेला नाही. मागील तीन दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यातून पाऊस (Rain in Maharashtra) कधी जाणार याबाबत हवामान खात्याने (IMD) खुलासा केला आहे. राज्यातून 20 ऑक्टोबरपर्यंत पाऊस पूर्णपणे माघार घेऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामानतज्ज्ञांच्या माहितीनुसार यंदा 3-4 ऑक्टोबरपासून परतीचा पाऊस सुरु झाला असून राज्यात शुक्रवारी परतीचा पाऊस दाखल झाला आहे.

हवामान खात्याने (Meteorological Department) वर्तवलेल्या अंदाजानुसार, 15 ऑक्टोबर रोजी म्हणजे आज विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 16 ऑक्टोबरला कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्र (Madhya Maharashtra), विदर्भातील (Vidarbha) सर्वच जिल्ह्यात तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह (Crack of Lightning) पावसाची शक्यता आहे. तसेच 17 ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची (Rain in Maharashtra) शक्यता आहे. यासोबतच 18 ऑक्टोबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मागच्या काही दिवसांत भारतातील काही भागात परतीच्या मान्सून पावसाने जोरदार हजेरी लावली.
पश्चिमेत होत असलेल्या वादळामुळे मान्सून पुन्हा सक्रीय झाला होता.
मात्र मागच्या तीन ते चार दिवसांत त्याची तीव्रता कमी झाल्याचे पहायला मिळत असल्याचे पुणे वेदशाळेतील अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

दिवाळीत तुरळक ठिकाणी पाऊस

उत्तर महाराष्ट्रात शनिवारपासून पावसाचा जोर कमी होईल.
तर दिवाळीदरम्यान मुंबई आणि दक्षिण कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो.

Web Title :- Rain in Maharashtra | rain updates monsoon return rain may continue for next 4 days in maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray | तुम्ही म्हणत होता ना सरकार पाडून दाखवा, आम्ही पाडले; आता बडबड बंद करा, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Andheri by-Election | ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला तर? ठाकरेंचा प्लॅन बी

Shinde-Fadnavis Government | शिंदे-फडणवीस सरकारने आता आपले खरे रंग दाखवायला रुवात केली, राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप