मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने राज्यात जोरदार (Rain in Maharashtra) हजेरी लावली आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. दरम्यान उद्या राज्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला असून पुढचे पाच दिवस राज्यात गडगडाटासह पाऊस (Rain in Maharashtra) पडण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. तसेच सोसाट्याचा वारा देखील वाहण्याची शक्यता आहे. आज राज्यातील मराठवाडा, विदर्भासह, कोकण मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी केला आहे.
उद्या (दि.9) पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, पुणे, ठाणे, अहमदनगर, सोलापूर लातूर, जालना, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नाशिक नंदूरबार या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
राज्यात 11 ऑक्टोबरपर्यंत पाऊस (Rain in Maharashtra) कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत काही काळ पाऊस तळ ठोकण्याची शक्यता आहे. आज मुंबईमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर पुढचे काही दिवस पावसाच्या मध्यम आणि हलक्या सरी बसरणार आहेत.
दरम्यान 10 ऑक्टोबर नंतरच मान्सून निघून जाईल आणि पावसाळा थांबणार असल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई, ठाणे, डोंबिवली आणि परिसरात आज सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत आहे.
डोंबिवलीमध्ये सकाळपासून 94.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
ठाणे, मुंबई मध्य आणि पूर्व उपनगरातही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत.
8/10, 1 am night: Mod to intense spells will continue at most places over Mumbai Thane NM, Palghar & parts of N Raigad for next 3,4 hrs as seen from latest radar observation.
It been raining since morning and many places, it has already crossed over 100 mm rainfall till now.
TC pic.twitter.com/OzJoj7F7Xb— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 7, 2022
7/10, 7.30 pm,Parts of N Mah including Mumbai Thane Pune Palghar Nashik Nandurbar,Aurangabad,Ahmednagar, parts of Gujarat,MP, E Vidarbha covered with dense clouds.Possibilities of rains with thunder in these areas next 3,4 hrs.
Thane Dist few stns Very heavy. Mumbai Heavy so far. pic.twitter.com/JETmgPWbqI— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 7, 2022
Web Title :- Rain in Maharashtra | rain weather update maharashtra heavy rains in important districts including mumbai kolhapur
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- RSS Chief Mohan Bhagwat On Cast System | धर्मशास्त्राला जातीगत विषमता अमान्य, जातीव्यवस्था हद्दपार व्हावी : मोहन भागवत
- CM Eknath Shinde On Dasara Melava Viral Video | BKC वरील दसरा मेळाव्यातील भाषणादरम्यान लोक उठून निघून गेल्याच्या Viral व्हिडिओवर CM शिंदेंनी भाष्य टाळले, म्हणाले – ‘ते जाऊ द्या पण…’