Rain in Maharashtra | राज्यात आगामी 5 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन Rain in Maharashtra | मागील ऑगष्टमध्ये पावसाने विश्रांती घेतली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीलाच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यांनतर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने राज्याला (Rain in Maharashtra) झोडपलं. तर पावसाची गती आणखी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात आगामी 4 ते 5 दिवसांत ढंगाच्या गडगडाटसह पाऊस (Rain) बरसरणार आहे. राज्यातील अनेक भागात पोषक हवामान झाल्याने पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी पाच दिवस राज्यात पाऊस धुमाकूळ घालणार आहे. असं हवामान खात्याने (Indian Meteorological Department) वर्तवलं आहे.

नुकतंच महाराष्ट्रात (Rain in Maharashtra) 20 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती.
त्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.
त्याची तीव्रता पुढील 24 तासांत आणखी वाढणार आहे. त्याचबरोबर, काही तासांनंतर हे क्षेत्र ओडिशा किनारपट्टीच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे.
परिणामी महाराष्ट्रात काही भागात मुसळधार पावसाचा (Rain) इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
त्यामुळे पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढणार आहे.

दरम्यान, विदर्भात पावसाची जोरदार हजेरी लागली आहे. अनेक भागात पावसाची स्थिती कायम आहे. नागपूर शहरालाही पावसाने झोडपले आहे.
आगामी 4 ते 5 दिवसात पावसाचा जोर आणखी वाढू शकणार असल्याचं हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) सांगण्यात आलं आहे.
तसंच अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळल्याने अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

Web Title : Rain in Maharashtra | rain with thunderstorms over the next five days in the state flood forecast in cities including rural areas

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nitin Gadkari | नितीन गडकरींची पुण्यात टोलेबाजी; म्हणाले – ‘माझ्याकडं पैशाची कमी नाही अन् मी कोणत्या अर्थमंत्र्यांकडे पैसे मागायला जात नाही’ (व्हिडीओ)

Pune Crime | पुण्यात दुधामध्ये भेसळ ! अन्न औषध प्रशासनाकडून FIR दाखल

Nitin Gadkari | नितीन गडकरींची मोठी घोषणा; म्हणाले – ‘पुणे-सातारा महामार्गावरील टोल रद्द करणार’ (व्हिडीओ)