Rain in Maharashtra | राज्यात विकेंडनंतर पुन्हा आस्मानी संकट, ‘या’ जिल्ह्यांत विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून Alert

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rain in Maharashtra | राज्यात मागील दोन आठवड्यापासून पारा वाढत आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यातील अनेक ठिकाणी किमान (Minimum) आणि कमाल तापमानात (Maximum Temperature) प्रचंड वाढ झाली आहे. काल मुंबईमध्ये (Mumbai) देखील तापमानात मोठी वाढ झाली होती. मुंबईचे तापमान 37.1 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. त्यामुळे सकाळपासूनच नागरिकांना उकाड्याचा त्रास जाणवत होता. त्यानंतर आजही राज्यात कमी जास्त प्रमाणात ही स्थिती कायम आहे. परंतु विकेंडनंतर (Weekend) दोन दिवस कोकणासह (Konkan) दक्षिण महाराष्ट्र (South Maharashtra) आणि मराठवाड्यात (Marathwada) पावसाची (Rain in Maharashtra) शक्यता आहे. विकेंडनंतर पुढील दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची (Rain with thunder) शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे.

 

हवामान खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.7) पालघर जिल्ह्यात (Palghar District) ढगाळ हवामानाची (Cloudy Weather) शक्यता असून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार आहेत. तसेच याचदिवशी नाशिकसह (Nashik), धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar) आणि जळगाव (Jalgaon) या ठिकाणी विजांचा गडगडाट (Thunder of Lightning) होणार आहे. आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच लांबचा प्रवास टाळावा असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.

10 जिल्ह्यात पावसाच्या सरी
मंगळवारी (दि.8) राज्यात पावसाची (Rain in Maharashtra) व्याप्ती वाढणार आहे. राज्यात कोकणासह दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मंगळवारी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बीड, परभणी आणि हिंगोली या दहा जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर पुण्यासह (Pune) अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट होणार आहे.

 

Web Title :- Rain in Maharashtra | rainfall possibilities in maharashtra after weekend imd give alerts know in details

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा