Rain in Maharashtra | राज्यात पुढील 48 तासात पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील अनेक भागात पावसाची (Rain in Maharashtra) रिपरिप सुरुच आहे. मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसानंतर अनेक ठिकाणी नदी-नाले, ओढे ओसंडून वाहत होते. आता काहीशी पावसाने विश्रांती घेतली आहे. परंतु राज्यातील काही भागांत पुन्हा एकदा पाऊस (Rain in Maharashtra) सक्रीय होण्याचा अंदाज आहे. मान्सूनचा (Monsoon) कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला आहे. त्यामुळे राज्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) होणार अशी माहिती हवामान खात्याने (Meteorological Department) दिली होती. त्यानुसार राज्यातील अनेक भागात पावसाने धुवाधार बँटिंग केली.

 

दरम्यान, आता पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्यानं (IMD) राज्यभर पुन्हा एकदा पाऊस होणार (Rain in Maharashtra) असल्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील 48 तासांत राज्यातील पुणे (Pune), सातारा (Satara), रत्नागिरी (Ratnagiri) आणि रायगड (Raigad) या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

पुढील 48 तासांत दक्षिण कोकण आणि गोवा किनारपट्टीवर तसेच घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra) आणि कोकणात (Konkan) पावसाची संततधार सुरु आहे. सध्या हा जोर कमी असला तरी येत्या काही तासांत पाऊस होणार आहे. काही भागांत पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुन्हा दमदार पावसाची शक्यता आहे.

 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात (Vidarbha) काही भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.
आज पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी आदी जिल्ह्यांतील घाटमाथ्यांवर काही भागांत जोरदार पवासाची शक्यता आहे.
तर मंगळवारी (दि.16) या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे.

 

Web Title :- Rain In Maharashtra | upcoming 48 hours heavy rain says imd konkan and western ghats rain in maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा