Rain in Maharashtra । आज पुण्यासह 5 जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा; हवामान खात्यानं दिला Red Alert

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rain in Maharashtra । महाराष्ट्रात मागील आठवड्यापासून पावसाने (Rain) जोर धरला आहे. तर पुण्यासह (Pune) कोकण (Kokan) भागात पावसानं धुमाकूळ घातला आहे. याचबरोबर आज देखील पाऊस (Rain) अनेक ठिकाणो जोर धरणार आहे. राज्यात अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता (Rain in Maharashtra) हवामान खात्यानं वर्तवली आहे. तसेच, पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या 5 जिल्ह्यांना आज रेड अलर्ट (Red Alert) दिला आहे. तर या पाच जिल्ह्यांत आज अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होणार असल्याचं भारतीय हवामान विभागानं (Meteorological Department) सांगितलं आहे.

पुणे (Pune), रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), कोल्हापूर (Kolhapur) आणि सातारा (Satara) या 5 जिल्ह्यात आगामी 24 तासांत 204.4 मिलिमिटर पेक्षा जास्त पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. गुरुवार (15 जुलै) नंतर महाराष्ट्रात पावासाचा (Rain) जोर ओसरू लागणार आहे. असा अंदाज अंदाज हवामान खात्याकडून (Meteorological Department) वर्तवण्यात आलं आहे. त्याचबरोबर आज मुंबईसह ठाणे परिसरात ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी करण्यात आला आहे. याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. दरम्यान, गेली 2 दिवस रत्नागिरी, रायगड याठिकाणी अनुक्रमे 135.5 आणि 137.7 मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. या 2 जिल्ह्यात आज देखील पावसाचा जोर कायम आहे. यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम पाऊस बरसणार असल्याचा अंदाज आहे.

या दरम्यान, जूनमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यानं (Monsoon) केरळात हजेरी लावली होती. त्यांनतर
काही दिवसांनंतर मान्सूननं (Monsoon) कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र राज्याला वेढा टाकात उत्तरेत
दाखल झाला. या कालांतराने पावसाची गती कमी आली. आणि तापमानात वाढ झाली. पाऊस
गायब झाल्याने शेतकरी देखील चिंतेत होता. वीस दिवसानंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे.
आता राज्यासह संपूर्ण देशात पावसाने जोर धरला आहे. असं हवामान खात्याकडून
(Meteorological Department) सांगण्यात आला आहे.

हे देखील वाचा

Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या आजचे दर

Society Maintenance । सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमधील सर्व सदनिकाधारकांना एकसमान मेंटेनन्स

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  rain in maharashtra | weather forecast extremely heavy rainfall expected in five districts including pune today imd-issued red alert

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update