Rain in Maharashtra | पुढील दोन दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, उद्या पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाची महत्त्वाची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rain in Maharashtra | राज्यातील काही जिल्ह्यात बुधवारी मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडला. या पावसामुळे अनेक भागांमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरात विजेचा कडकडाट (Lightning) आणि ढगांच्या गडगडाटासह (Thunder) मुसळधार पाऊस (Rain in Maharashtra) झाला आहे. यानंतर आता हवामान विभागाने (IMD) पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसासह (Very Heavy Rain) वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे.

 

हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार स्वरुपाचा पाऊस (Rain in Maharashtra) पडण्याची शक्यता आहे. यावेळी विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होण्याची दाट शक्यता आहे. हवामान विभागाने 7 ते 11 सप्टेंबर या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

 

गुरुवारी पावसाचा जोर वाढणार
वातावरणात झालेला बदल हा अनपेक्षित आहे. वातावरणातील होणारे बदल आणखी किती वेळ राहील, पाऊस किती वेळ थांबेल याबाबत हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर (KS Hosalikar) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात 8 सप्टेंबर पासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, असं होसाळीकर यांनी सांगितले. त्यानुसार आज दुपारनंतर राज्यात ठिकठिकाणी पावसाचं थैमान बघायला मिळत आहे.

 

या जिल्ह्यात विजांसह जोरदार पाऊस
राज्यातील जिल्ह्यंमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. यामध्ये कोकणातील रायगड,
रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचा जोर असणार आहे. तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक नगर, पुणे,
सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. विदर्भात बुलडाणा,
अकोला, वाशीम, अमरावती वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात पाऊस थैमान घालण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Rain in Maharashtra | weather forecast possibility of heavy rain in maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | शिक्षकांनी शिक्षणदानाचे काम व्यवसाय म्हणून न करता ध्येय म्हणून करावे – चंद्रकांत पाटील

 

Pune PMC News | महापालिकेच्या सेवा- सुविधा आता ‘व्हॉटस् ऍप चॅटबॉटवर’ सुरू ; पहिल्या टप्प्यातील मिळकत कर सेवेस प्रारंभ

 

Pune Pimpri Crime | निलंबित पोलीस असल्याचे सांगत PG मालकाला मारहाण, हिंजवडी परिसरातील घटना