Rain in Maharashtra | महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती, आज पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rain in Maharashtra | राज्यात मागील दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला. राज्यातील प्रमुख शहरासह ग्रामीण भागात पावसाने थैमान घातल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह (Thunder) मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडण्याची शक्यता आहे. आज (बुधवार) कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्र (Madhya Maharashtra), मराठवाड्याच्या (Marathwada) दक्षिण भागातील जिल्ह्यात विजांसह पावसाचा (Rain in Maharashtra) इशारा कायम आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून 1.5 किमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून केरळ किनारपट्टीपर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मंगळवारी (दि.18) सकाळपर्यंतच्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. तर कोकण, मराठवाडा, विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडला आहे. आज (बुधवार) कोकण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा (Rain in Maharashtra) अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.

या जिल्ह्यात विजांसह पाऊस

कोकण – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
मध्य महाराष्ट्र – नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर
मराठवाडा – बीड, लातूर, उस्मानाबाद

मान्सून परतण्यास पोषक हवामान

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (South-West Monsoon Winds) परतीच्या प्रवासात शनिवारी (दि.15) संपूर्ण मेघालय, सिक्कीम, बिहार, मध्य प्रदेश, आसाम, त्रिपुरा, पश्चिम बंगालचा काही भाग, विदर्भासह महाराष्ट्राचा आणखी काही भागांतून माघार घेतली आहे. गुरुवार (दि.20) चौवीस तासात विदर्भ, छत्तीसगड, अंतर्गत महाराष्ट्र, झारखंड ओडिशाच्या काही भागांतून मान्सून माघार घेण्यास पोषक स्थिती असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

Web Title :- Rain in Maharashtra | weather udpate cyclonic status in bay of bengal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा