Rain in Maharashtra | दिवाळीवर पावसाचे सावट; परतीचा पाऊस लांबला

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – Rain in Maharashtra | राज्यातील पाऊस परतीचे नाव घेत नाही. परतीचा पाऊस लांबतच चालला आहे. त्यामुळे यंदाही दिवाळी (Diwali) पावसात जाणार आहे. दिवाळी सणावर पावसाचे (Rain in Maharashtra) सावट आहे.

मागील काही दिवसांत राज्यात झालेल्या अतिवृष्टीने (Heavy Rain) कापणीला आलेल्या पिकांचे नुकसान केले. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. तसेच पावसाचा परिणाम अन्न-धान्य, फळे आणि भाज्या पुरवठ्यावर देखील झाला आहे. आगामी काळात अन्न धान्ये आणि भाज्या, फळे महाग होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार (दि. 22) कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra) आणि मराठवाड्यातील (Marathwada) काही जिल्ह्यांमध्ये विजांसह मोठ्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच इतर ठिकाणी हलक्या आणि मध्यम सरींचा अंदाज देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच या पट्ट्याची तिव्रता वाढत आहे. त्यामुळे राज्यावर पुन्हा एकदा पावसाचे सावट आहे. अंदमानमधील कमी दाबाच्या क्षेत्रापासून तमिळनाडू, केरळ ते आग्नेय अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या (Kerala) किनाऱ्यालगत चक्राकार वारे वरील प्रणालीत मिसळून गेले आहेत. पंजाब आणि परिसरावरही चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. यामुळे देशभरात पुढचे दोन दिवस पाऊस होण्याची शक्यता आहे. (Rain in Maharashtra)

राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे.
तसेच शहरे देखील मागील काही दिवसांत तुंबली होती.
मागच्या 24 तासांत पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे सर्वाधिक 110 मीमी पावसाची नोंद झाली.
हा पुणे शहरात या वर्षीचा सर्वाधिक पाऊस (Rain in Pune) आहे. आज (दि. 22) देखील कोकणातील रत्नागिरी,
सिंधुदुर्ग, तसेच मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद, जिल्ह्यात
विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Web Title :-  Rain in Maharashtra | weather updates in maharashtra mumbai pune konkan vidarbha imd alert heavy rain

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | दिवाळीच्या स्टॉलसाठी फिडरमधुन वीज घेण्याचा प्रयत्न करताना तरुणाचा मृत्यू

Maharashtra IPS Officer Transfer | महाराष्ट्र पोलीस दलातील 5 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Sujit Patwardhan Passed Away | परिसर संस्थेचे सुजित पटवर्धन यांचे निधन