Rain in Maharashtra | आज पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात गडगडाटासह पाऊस, पुढील तीन दिवस राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rain in Maharashtra | मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने उष्णतेत वाढ होताना दिसत आहे. याचदरम्यान विदर्भात (Vidarbha) परतीच्या पावसाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. परतीच्या पावसाची पहिली चाहूल राजस्थानात (Rajasthan) लागली असली तरी मुंबईसह राज्यात पुन्हा एकादा पाऊस (Rain in Maharashtra) थैमान घालण्याची शक्यता आहे. बुधवारी मुंबईसह उपनगरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तर पुढील तीन दिवस राज्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाची (Rain with thunder) शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे.

राजस्थानमध्ये परतीच्या पावसाची चाहूल लागली असली तरी पावसाची आगेकूच झालेली नाही. यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परतीच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र राज्यातील वेगवेगळ्या भागात उष्णतेत वाढ झाली आहे. परतीचा पाऊस 5 ऑक्टोबरला राज्यात दाखल होणार असला तरी त्याचा वेग पाहता राज्यात परतीच्या पावसाला (Rain in Maharashtra) दाखल होण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे.

आज विजांच्या कडकडाटासह पाऊस

हवामान खात्याने (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, आज (दि.29) कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शुक्रवारी (दि.30) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. शनिवारी (1 ऑक्टोबर) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

आज पुण्यात गडगडाटासह पाऊस

आज (दि. 29) कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता आहे. नांदेड यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, ठाणे जिल्ह्यांत गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे.

Web Title :- Rain In Maharashtra | weather updates in maharashtra mumbai pune konkan vidarbha imd alert heavy rain

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पेट्रोलची नशा? 5 अल्पवयीन मुलांकडून युवकाच्या खुनाचा प्रयत्न, सिंहगड रोड परिसरातील घटना

Bug In Whatsapp | व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आलेल्या धोकादायक बग बाबत CERT ने जारी केला अलर्ट, डाटा लीक होण्याचा धोका

Domestic LPG Consumers | LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी ! वर्षभरात केवळ 15 सिलिंडरच मिळणार, महिन्याचा कोटा सुद्धा ठरला!