Rain in Maharashtra | राज्यात ‘या’ ठिकाणी येलो अलर्ट, 1 सप्टेंबर पासून पावसाचा जोर वाढणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rain in Maharashtra | जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने पाऊस पडेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात होती. मात्र जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु झालेल्या पावसाने (Rain in Maharashtra) मागील दोन दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. दरम्यान राज्यातील काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून (Department of Meteorology) देण्यात आली आहे. मुंबईसह, ठाणे परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. अन्य ठिकाणी मात्र पावसानं उघडीप दिली आहे.

 

हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, येत्या चार ते पाच दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा (Rain in Maharashtra) जोर कमी असेल मात्र पुन्हा महिन्याच्या सुरुवातीला पावसाने थैमान घालण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर 1 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आजपासून पुढील दोन दिवस विदर्भात (Vidarbha) पावसाचा येलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. तर इतर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. अतिवृष्टीचा मोठा फटका विदर्भ आणि मराठवाड्याला (Marathwada) बसला आहे. अशातच आता पुन्हा एकादा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, 1 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार असल्याने शेतकऱ्यांनी योग्य ते नियोजन करावं असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

 

सरासरीपेक्षा जास्त पाऊस

जूनपासून आतापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.
नदी आणि धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. जून महिन्यात पावसाने दडी मारली होती.
मात्र जुलै, ऑगस्टमध्ये राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली होती.
या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते.
अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला. तसेच शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

 

Web Title : –  Rain in Maharashtra | Yellow alert at this place in the state rainfall will increase from September 1

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा