Rain in Maharashtra | संपूर्ण राज्यात पावसाचा ‘येलो’ अलर्ट, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rain in Maharashtra | काही दिवसांची उघडीप मिळाल्यानंतर पावसाने पुन्हा थैमान घालायला सुरुवात केली आहे. मागच्या चार दिवसांपासून हवामान खात्याकडून (Meteorological Department) पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान राज्यातील बहुतांश भागात पावसाचा येलो अलर्ट (Yellow Alert) आणि ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. तर पुणे (Pune) आणि सातारा (Satara) या सारख्या जिल्ह्यामध्ये रविवारपर्यंत पावसाचा (Rain in Maharashtra) जोर वाढू शकतो, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे येत्या 13 सप्टेंबर पर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.

पुणे, नाशिक (Nashik), अहमदनगर (Ahmednagar) या भागात पावसाने थैमान घातले आहे. दरम्यान, आजही हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा (Rain in Maharashtra) देण्यात आला आहे. आजही संपूर्ण राज्यात हवामान विभागाने पावसाचा ‘येलो अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

मान्सूनच्या पावसासाठी पोषक हवामान असल्याने राज्याच्या विविध भागात विजा (Lightning), मेघगर्जनेसह (Thunder) मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. दक्षिण कोकणातील जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रासह इतर राज्यात पाऊस पडत आहे.

महाराष्ट्रात येत्या 5 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
रविवारपासून मुंबई आणि ठाणे परिसरासह कोकण आणि मध्य महाराष्ट्र भागात त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता
आहे. पश्चिम मध्य व लगतच्या पूर्व मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.
त्यामुळे भारतात पुढील चार ते पाच दिवसांत मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

Web Title :-Rain in Maharashtra | yellow alert for rain in the entire maharashtra weather update

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Itchy & Dry Skin | त्वचा नेहमी कोरडी राहते का? ‘हा’ आजार असू शकतो कारणीभूत

Police Family On MP Navneet Rana | ‘पोलिसांबद्दल तू नेहमीच अपशब्द वापरतेस, आता माफी माग, नाहीतर…’; नवनीत राणांना पोलीस पत्नीचा इशारा

Pune Pimpri Crime | गणेश विसर्जन मिरवणुकीवरुन तळेगावमध्ये टोळक्यांचा राडा, दोघांवर कोयत्याने वार

Top Stocks | कोणत्या शेअरने मिळेल पैसा? फेस्टिव्ह सीझनसाठी एक्सपर्टने सुचवले ‘हे’ 5 स्टॉक्स