Rain in Maharashtra | राज्यात आज ‘येलो अलर्ट’ ! पुणे, मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rain in Maharashtra | राज्यात थैमान घालणाऱ्या पवासाचा वेग आता मंदावला आहे. असे असले तरी काही भागात मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात पावसाचा वेग मंदावला (Rain in Maharashtra) असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत काहींशी घट झाली आहे. दरम्यान, राज्यात मुसळधार पावसाचा वेग मंदावला असला तरी तुरळक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. पुणे (Pune), मुंबई (Mumbai) आणि उपनगरात जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

 

सध्या गुजरात (Gujarat) ते उत्तर केरळच्या किनारपट्टीलगत (North Kerala Coast) द्रोणीय स्थिती आहे. तर सौराष्ट्रापासून उत्तर-पूर्व अरबी समुद्रापर्यंत येत्या 48 तासांत कमी दाबाचा पट्टा (Low Pressure Zone) तयार होणार आहे. या स्थितीमुळे कोकणच्या किनारपट्टीवर (Konkan Coast) सोसायट्यांचा वारा वाहून मुसळधार पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain in Maharashtra) पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडेल. परंतु उर्वरित ठिकाणी हलका पाऊस पडेल तर काही ठिकाणी पावसाची उघडीप राहणार आहे.

 

 

या जिल्ह्यांना येलो अलर्ट

राज्यात आज (दि.11) पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, कोल्हापूर (घाटमाथा), सातारा (घाटमाथा), अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ (Yellow Alert) दिला आहे.

 

Web Title :- Rain in Maharashtra | yellow alert in the maharashtra there is a
possibility of heavy rain in pune and mumbai maharashtra rain news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा