उत्तर भारतात ‘बर्फवृष्टी’ आणि ‘पाऊस’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – राजधानी दिल्लीसह हरियाना आणि पंजाबमध्ये तसेच उत्तराखंडच्या मैदानी प्रदेशात पाऊस, तर जम्मू काश्मीर, श्रीनगर, उत्तराखंडचा उंचावरील प्रवेशात ताजी बर्फवृष्टी झाली.
राजधानी दिल्लीत ५.७ मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला, मात्र पावसामुळे थंडीची लाट काही ओसरली नाही.

आर्द्रतेचे प्रमाण १०० टक्के होते आणि किमान तापमान १०.५ सेल्सिअस होते. राजधानीत विधानसभा निवडणूक प्रचार थंडी आणि पाऊस अशा संमिश्र वातावरणात चालू आहे. उत्तर काश्मीरमध्ये बर्फवृष्टी झाली, गुलमर्ग येथे उणे ८ डिग्री तापमान होते. श्रीनगरमध्ये ०. ६ डिग्री तापमान राहिले.

बद्रीनाथ, हेमकुंड साहिब, नंदा देवी, केदारनाथ कस्तुरी मृग अभयारण्य बर्फाच्छादित आहे. उत्तर भारतात ताजी बर्फवृष्टी आणि थंडीची लाट याचा परिणाम महाराष्ट्रावरही होत असून पुढील दोन दिवस थंडी राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे.

फेसबुक पेज लाईक करा

You might also like