प्रचाराचा शेवट होतोय पावसाने, पुण्यासह अनेक शहरात पाऊस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अरबी समुद्रात आलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक शहरात सध्या पाऊस होत आहे. प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून संपूर्ण मतदारसंघात दुचाकी रॅलीचे अनेक उमेदवारांनी आयोजन केले आहे. मात्र, या रॅलीला पावसाचा अडथळा येत आहे. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये आज सकाळपासून अधूनमधून पावसाच्या सरी येत आहे. संपूर्ण आकाश ढगांनी दाटून गेले आहे.

शुक्रवारी सातारा येथे भरपावसात शरद पवार यांचे तडाखेबंद भाषण झाले. पावसातील हे भाषण जोरदार व्हायरल झाले आहे. शनिवारी सकाळी अजित पवार यांची हडपसर विधानसभा मतदारसंघात रॅली होती. मात्र, पावसामुळे ती रद्द करण्यात आली. सकाळी ९ वाजता रॅली सुरु करण्याचे नियोजन शहरातील अनेक उमेदवारांनी केले होते. पण, पावसाच्या सरी येत असल्याने अनेकांच्या रॅली सुरु होण्यास उशीर होत होता.
राज्यात रायगड, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाऊसाच्या सरी आल्या आहेत.

गडगडाटासह वीजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. आज सकाळपासून सुरु असलेले पावसाळी वातावरण लक्षात घेता सायंकाळी सहा वाजता जेव्हा प्रचार संपेल, त्यावेळी अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरुवातीपासून प्रचाराचा अडथळा ठरलेल्या पावसाने प्रचाराचा शेवट होण्याची शक्यता आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी