Rain in Pune | केवळ अर्ध्या तासात पुणे शहरात पावसाचा हाहाकार, अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना, एकाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हवामान खात्याने शुक्रवार (दि.30) पासून पुणे जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची (Rain in Pune) शक्यता वर्तवली होती. त्यानुसार, आज दुपारी चारच्या सुमारास पुणे शहरासह जिल्ह्याला पावसाने (Rain in Pune) झोडपून काढले. पुणे शहरात पावसाने चांगलाच हाहाकार उडवला आहे. अनेक ठिकाणी झाडपडीच्या (Tree Fell) घटना घडल्या आहेत तर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने याचा वाहतुकीवर (Traffic) परिणाम झाल्याचे पहायला मिळाले. चार वाजता शहरात पावसाला सुरुवात झाली यावेळी घडलेल्या झडपडीच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना रामनगर भागात घडली. रामनगर भागात एका रिक्षावर मोठे झाड पडून एका वयोवृद्धाचा मृत्यू झाला.

 

पुण्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाने (Rain in Pune) जोर धरल्याने शहरातील सखल भागात पाणी साचले.
नाना पेठ (Nana Peth), चमडी गल्ली (Chamdi Galli) येथे मुसळधार पावसाने (Heavy Rain) दुचाकी पडल्या.
रस्ता पेठ, कल्याणी नगर (Kalyani Nagar), स्वारगेट (Swargate), बालाजी नगर, धनकवडी (Dhankawadi), कात्रज (Katraj), पिंपरी चिंचवड शहरासह (Pimpri Chinchwad city) जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने अवघ्या अर्ध्या तासात दाणादाण उडवून दिली.

 

पुणे शहरात पावसाचे पाणी तुंबल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.
मात्र, आजच्या पावसामुळे एका वयोवृद्ध रिक्षा चालकाचा दुर्दैवी मृत्यू (Rickshaw Driver Death) झाला.
पावसासोबत वेगाचा वारा असल्याने अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत. पुणे अग्निशामक दलाच्या (Pune Fire Brigade) जवानांकडून मदत कार्य सुरु आहे.

 

Web Title :- Rain in Pune | rickshaw puller died after a tree fell due to heavy rain in pune marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune News | कारागृहातील भगिनींनी लुटला भोंडल्याचा आनंद

Uddhav Thackeray vs BJP | शिल्लकसेनेचा दसरा मेळावा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भरवशावर, भाजपाची शिवसेनेवर टीका

Shobha R Dhariwal | विद्यार्थ्यांना संगणकाचे तांत्रीक प्रशिक्षण मिळणे काळाची गरज – शोभा आर धारीवाल