पावसामुळे ‘कोरोना’ व्हायरसची वाढतेय भीती, वेळ नाही अशी सबब हद्दपार – महिलांची उन्हाळी कामे खोळंबली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- मागिल तीन दिवसांपासून सकाळी कडाक्याचे उन आणि दुपारी चार-पाच्या सुमारास ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या लखलखाटात पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाची भीती आणखी गडत होत आहे. सायंकाळी पाच वाजता सुरू झालेला पाऊस उशिरापर्यंत सुरू होता.

कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे लॉकडाऊन असल्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळही आज तुलनेने कमी होती. त्यात पाऊस सुरू झाल्यामुळे तुरळक वाहनेच धावताना दिसत होती. 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी स्वतःला घरात राहणेच पसंत केले आहे. मागिल आठवड्यापासून प्रत्येक घरामध्ये सर्व कुटुंबीय एकत्र बसून नाश्ता, चहा आणि जेवणाचा आनंद घेत आहेत. विचारांचे आदानप्रदान होत आहे. शहरवासिय झाल्यापासून पहिल्यांदाच सर्व कुटुंबीय आवडाभर एकत्र असल्याच्या चर्चेलाही उधाण आले आहे. आता कोणालाही कामावर जायची घाई नाही, दुकानात जायची घाई नाही, थांबायला वेळ नाही, अशी सबब एकावी लागत नाही.

देशामध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे सावट वाढत आहे. कोरोनाचे लोण राज्याच्या नव्हे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत असून, नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. शाळा-महाविद्यालयांबरोबर अनेक कंपन्यांनीही सुटी जाहीर केली आहे. तर आयटी कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा अवलंब केला आहे.

उपनगरालगतच्या गावामध्ये आजही मोठ्या प्रमाणावर शेती व्यवसाय सुरू आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे यावर्षी गहू, हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच तरकारी भाजीपाला काढण्यासाठी कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे मजूरही काम करण्यासाठी येत नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. शेतामध्ये शेतमाल आहे मात्र तो काढण्यासाठी मजूर नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

महिलांची उन्हाळी कामे खोळंबली
उन्हाळा सुरू झाला असून, वर्षभरासाठी मसाला बनवणे, चटण्या बनविणे, कुरडया, पापड्या, सालपापड्या अशी कामे करण्यासाठी महिलांची कामासाठी धांदल उडाली आहे. मात्र, दुसरीकडे सायंकाळच्या वेळी मागिल तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे मोठी अडचण झाली आहे. तसेच कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे दुकानातून मसाल्याचे साहित्य खरेदी करून आणले असून, मिरच्या वाळवल्या आहेत. मात्र, मसाला करण्याचे डंखे बंद असल्याने मोठी अडचण झाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like