Rain in Western Maharashtra | खडकवासला प्रकल्पात 24 तासात एक TMC नं पाणीसाठा वाढला; कृष्णा-भीमा खोर्‍यात दमदार पावसाने शेतकरी सुखावला

पुणे : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह कोकणातच बस्तान ठोकून महापूराचे संकट आले असला पश्चिम महाराष्ट्र (Rain in Western Maharashtra) मात्र पावसाकडे डोळे लावून बसला होता. गेल्या दोन दिवसांपासून सह्याद्री ओलांडून पावसाने पश्चिम महाराष्ट्रात (Rain in Western Maharashtra) बरसण्यास सुरुवात केली आहे. कृष्णा -भीमा नदीच्या (krushna and bhima rivers) खोर्‍यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकर्‍यांसह नागरिक सुखावले आहेत.

पुणे (Pune) शहराला पाणी पुरवठा करणार्‍या खडकवासला प्रकल्पात (khadakwasla dam) गेल्या २४ तासात तब्बल एक TMC हून अधिक पाणीसाठा वाढला आहे. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये मिळून आज सकाळपर्यंत १२.२४ टीएमसी पाणीसाठा झाला असून तो एकूण ४१.९९ टक्के झाला आहे. काल याच वेळी हा पाणीसाठा ३७.८३ टक्के इतका होता.

वरसगाव धरण (warasgaon dam) क्षेत्रात गेल्या २४ तासात ११४ मिमी पाऊस झाला असून धरणातील पाणीसाठा ३८.८२ टक्के झाला आहे. पानशेत परिसरात १२६ मिमी पाऊस झाला असून धरणात ४९.२२ टक्के साठा झाला आहे. टेमघर (temghar dam) धरणावर ६५ मिमी पावसाची नोंद झाली असून धरणातील पाणीसाठा २६.८७ टक्के झाला आहे. मुळशी धरण (mulshi dam) परिसरात ५९ मिमी, खडकवासला ((khadakwasla dam)) परिसरात १५ मिमी़ डिंभे (dimbhe dam) ३८, कळमोडी (kalmodi dam) ४८, वडिवळे (Vadiwale Dam) ८९, पवना (pavana dam) ९४, वडज (vadaj dam) ११, गुंजवणी (gunjawani dam) ५५, निरा देवघर (nira deoghar dam) ६३, भाटघर (bhatghar dam) १५, माणिकडोह (manikdoh dam) परिसरात २२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

कृष्णा (krishna backwater) खोर्‍यातील १३ धरण क्षेत्रातही दमदार पावसाने हजेरी लावली
असून धरणातील पाणी साठ्यात वेगाने वाढ होत आहे. महाबळेश्वर (mahabaleshwar) येथे
गेल्या २४ तासात १४० तर नवजा येथे १४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरण
(koyna dam) क्षेत्रात १०९ मिमी पाऊस पडला. धरणातील पाणीसाठी ५२.१६ टक्के झाला आहे.
गेल्या २४ तासात धरणातील सव्वतीन टक्के वाढ झाली आहे. राधानगरी परिसरात
(radhanagari dam) १३० मिमी, कासारी (kasari dam) १७४, दुधगंगा (dudhganga
dam) ७७, वारणावती (warnawati)६८, धोम बलकवडी (dhom balkawadi) ६७, तुळशी
धरण (tulshi dam) परिसरात १०७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे.

हे देखील वाचा

Nanded Crime | नांदेडमध्ये थरार ! जेलमधून जामिनावर बाहेर आलेल्यावर गोळीबार, तलवारीने वार करत कुख्यात गुंडाचा ‘खात्मा’

Police Inspector Suspended | पोलिस आयुक्तांची कारवाई ! 2 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे तडकाफडकी निलंबन तर दोन सहाय्यक आयुक्त कंट्रोल रूमशी संलग्न

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update