राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून  या मुळे राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि खान्देशात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cc8fbd3d-bd52-11e8-8a50-8f1133fc3765′]

आंध्र प्रदेश, ओदिशा, पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत वारे ताशी ५५ ते ७५ किलोमीटर वेगाने वाहणार असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातही पावसाची शक्यता आहे. काळी काळ उसंत घेतलेल्या पावसाचे पुन्हा आगमन होत आहे. गुरूवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला. विदर्भातील बराच भाग आणि मराठवाड्यातील काही भागांवर ढग दाटलेले दिसून येत आहेत. येत्या २४ तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

सामान्यांना सतावणाऱ्या प्रश्नांवर सरकार बोलत नाही : सयाजी शिंदे

कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज शहरामध्ये अचानक आलेल्या परतीच्या पावसाने गडहिंग्लजला झोडपून काढले. त्यामुळे काही काळासाठी पूरस्थिती निर्माण झाली होती. गडहिंग्लजमधल्या बाजारपेठेत तर पावसाने धुळदाण उडवली होती. कोल्हापूर शहर आणि परिसरातही जोरदार पाऊस पडला.

[amazon_link asins=’B00HT06T54,B01MFX8D7E’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’71ad06a7-bd53-11e8-9c78-e9dde91c7800′]

You might also like