राज्यात अतिवृष्टीमुऴे दाणादाण ! 14 जणांचा बळी तर पिकांचे प्रचंड नुकसान, मुख्यमंत्र्यांचे सर्व यंत्रणांना सतर्कतेचे आदेश

पुणे- पोलीसनामा ऑनलाईन – पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे दाणादाण उडाली. बुधवारी झालेल्या ढगफुटीमुळे अनेक नद्यांना पूर आला. पुणे जिल्ह्यात पूरात वाहून गेल्याने चौघे मरण पावले. तर सोलापूर जिल्ह्यात 14 जणांचा बळी गेला. प्राथमिक अंदाजानुसार 23 जिल्ह्यातील काढणीस आले्ल्या साडेचार लाख हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसला असून तूर, कापूस, भात आदीलाही फटका बसला आहे. मनुष्यहाणी टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व यंत्रणांना सर्तकतेचे आदेश दिले आहेत.

सोलापूर, पंढरपूर, बारामती, उस्मानाबाद आदी ठिकाणी एनडीआरएफच्या तुकड्या तैन्यात केल्या आहेत. वायूसेना, नौदल, लष्कर आदीना मदतीसाठी सर्तक राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सोलापूर – 14 जणांचा बळी
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 14 जणांचा बळी गेला आहे. 565 गावे बाधित झाली असून 4731 कुटुंबाचे स्थलांतर झाले आहे.

उस्मानाबादः 130 जणांची सुटका
उस्मानाबाद जिल्ह्यात पुरात अडकलेल्या 130 जणांची एनडीआरएफच्या मदतीने सुटका करण्यात आली.

सांगलीः अतिवृष्टीचा तडाखा
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सुमारे शंभर गावातील रस्ते वाहतूकीसाठी बंद झाले आहेत. तर कृष्णा नदीला पूर आला आहे.

कोल्हापूर- पिकांचे नुकसान
कोल्हापूर जिल्ह्यात काढणीस आलेल्या पावसाने पिकांचे मोठे नकसान झाले.