अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रहात असलेल्या ‘व्हाईट हाऊस’ला देखील पावसाचा ‘फटका’ !

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – भारताच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पावसाने कहर केला असताना व न्यूज चॅनेलवर मुंबईचा उल्लेख तुंबई असा होत असताना तिकडे जगातील सर्वात शक्तीमान समजल्या जाणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रहात असलेल्या व्हाईस हाऊसच्या कार्यालयातही पावसाचे पाणी घुसले आहे. त्यामुळे तेथील कर्मचारी बेहाल झाले आहेत.

अमेरिकेतील वॉशिंग्टन सह परिसरातील अनेक ठिकाणी सोमवारी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी या पुरात गाड्या वाहून गेल्या आहेत.
राष्ट्रीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत सोमवारी सकाळी ९ ते १० या एका तासात ८४ मिमी पावसाची नोंद झाली. हा वॉशिंग्टनमधील एक विक्रम आहे. यापूर्वी येथे एका तासात ५६ मिमी पावसाची नोंद झाली होती. वर्जिनिया येथे याचवेळी एका तासात १२७ मिमी पाऊस पडला.

मुंबईत यापेक्षा अधिक पाऊस पडतो. मात्र, त्यापेक्षा वॉशिंग्टनची अवस्था अधिक बिकट झाली आहे.
पावसामुळे वॉशिंग्टनमधील संग्रहालये आणि स्मारके बंद करण्यात आली आहेत. व्हॉईट हाऊसच्या बेसमेंटमध्ये असलेल्या अध्यक्षांच्या कार्यालयात पाणी शिरले असून ते बाहेर काढण्यासाठी अनेक कर्मचारी, अग्निशामक दलाची पथके कामाला लागली आहेत.

रस्त्यांवर पाण्याचे पुर आले असून त्यामुळे गाड्यांमध्ये अनेक चालक फसले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी अशा गाडीत फसलेल्या १५ चालकांची सुटका केली तर पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी रस्त्यांवरुन चक्क लाइफबोटींचा वापर करण्याची वेळ आली आहे.

पावसाळ्यात ‘अस्वच्छ’ पाणी पिल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

सेक्सलाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी घ्या ‘हा’ आहार

उपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई

डायबिटीज, सर्दी, ताप, कावीळ या आजारांवर भेंडी आहे गुणकारी

औषध न घेताही नियंत्रणात ठेवू शकता कोलेस्टेरॉल, हे आहेत ५ उपाय

केवळ पौष्टिकच नाही तर औषधीही आहे ‘उडीद डाळ’ ; जाणून घ्या फायदे