पावसाचं पाणी ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांच्या घरात देखील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मायानगरी मुंबई – पुणे सोबतच अनेक ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला आहे. कालपर्यंत उन्हाने त्रस्त असलेले नागरिक आता पावसाने त्रस्त होत आहेत. मुंबईकरांसाठी तर पाऊस आता समस्या बनली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानूसार येत्या २४ तासात काही भागात टप्प्या टप्प्याने पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मुंबई आणि पुण्यात पावसामुळे भिंत कोसळून २२ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक लोक जखमी झाले आहेत.

Related image

या पावसाने बिग बी अमिताभ बच्चन यांनाही घेरलं आहे. या धोधो पडणाऱ्या पावसामुळे अमिताभ यांच्या घरात पाणी शिरल्याने घरात ये-जा करण्यास मोठी कसरत करावी लागत असल्याचे दिसत आहे. सध्या अमिताभ बच्चन यांचे अनेक चित्रपटांसाठी शुटींग सुरु आहे. ‘गुलाबो सिताबो’, ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘चेहरा’ या चित्रपटात ते दिसणार आहेत.

Related image

अमिताभ बच्चन यांच्या घरासमोर पाणी साचणे ही नविन गोष्ट नसून याआधी ही त्यांच्या घरासमोर पाणी साचल्याने समस्या निर्माण झाली होती. मुंबई मध्ये गेल्या दोन दिवसात ५५० मिमी पाऊस झाला आहे. गेल्या एक वर्षात जेवढा पाऊस पडला नाही तेवढा दोन दिवसात पडला आहे. सोमवारी झालेल्या पावसामुळे वाहतूक कोंडी आणि रेल्वे मार्ग विस्कळीत झाले आहे. तर मुंबई मध्ये हाय अलर्टची घोषणा करण्यात आली आहे.

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

शरीराला पाण्याची गरज का असते ? जाणून घ्या ही ५ कारणे

महिलांनो, बाळंतपणानंतर पुन्हा मिळवता येऊ शकतो कमनीय बांधा

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील रिलॅक्स करणे गरजेचे

हिंमत असेल तर आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी’

विना परवाना शेकडो खड्डे खोदल्याने नगर परिषदेचा समोर आला गलथान कारभार

 

 

 

You might also like