Rain | विजेच्या कडकडाटासह पाऊस ‘धो-धो’ कोसळत असल्यास काय काळजी घ्यावी? घराच्या बाहेर असल्यास काय करावं? जाणून घ्या

यवतमाळ जिल्ह्यात मागील ६ वर्षात वीजपडून १०१ लोकांचा मृत्यू झाला आहे

पोलीसनामा ऑनलाइन : दरवर्षी यवतमाळ जिल्ह्यात वीज पडल्याने अनेकांचा मृत्यू होतो. बहुतांश वेळी विजेच्या कडकडाटासह (Rain) पाऊस (Rain) सुरू असतो आणि बरेच जण पावसापासून बचाव करण्यासाठी झाडांचा आसरा घेतात. अशावेळी नेमकी वीज झाडांवर कोसळते. त्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. मागील ६ वर्षात नैसर्गिक वीज कोसळून जिल्ह्यात आजपर्यंत १०१ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे . यवतमाळ जिल्ह्यात मागील ६ वर्षात वीजपडून १०१ लोकांचा मृत्यू झाला आहे. पावसाळ्याच्या (Rain) दिवसात शेती काम करताना अशा घटना बरेचदा होतात. यासाठी बचाव आणि सुरक्षा आणि गोष्टींचे पथ्य पाळले तर अशा घटना टाळता येऊ शकतात.

गळगळातीचे वादळ असल्यास उंच जागांवर, टेकडीवर ,मोकळ्या जागेवर, समुद्रकिनारी, स्वतंत्र झाड, रेल्वे, बस, टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, उघडी वाहने आणि पाणी इत्यादी टाळावे.

घरात असल्यास वायरद्वारे जोडले गेलेले फोन मोबाईल, इलेक्ट्रिक उपकरणे विद्युत जोडणीस लावू नये.
गडगडीच्या वादळादरम्यान वीज चमकताना कोणतेही विद्युत उपकरण वापर करू नये.

तसेच वादळी वारा किंवा विजा चमकतात त्यावेळी घरात असल्यास घराच्या खिडक्या आणि घराचे दरवाजे बंद ठेवाव्यात.

तसेच घराच्या खिडक्यांच्या कुंपनंपासून दूर राहावे.
मेघगर्जना झाल्यापासून ३० मिनिटे घराच्या आतच राहावे.

आपण जर घराबाहेर असल्यास त्या वेळेस सुरक्षित निवाराच्या ठिकाणी मजबूत इमारतीकडे जाण्याचा प्रयत्न करावा.

शिवाय ट्रॅक्टर, शेती अवजारे, मोटरसायकल, सायकल यांच्यापासून दूर राहावे. गाडी चालवत असल्यास सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करावा.

उघड्यावर असल्यास शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व डोके दोन्ही गुडघ्यांमध्ये झाकावे.

जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा.
मोकळ्या तसेच लटक्या विद्युत तारांपासून दूर राहावे. जंगलामध्ये उताराच्या जागेवर निवारा घ्याव्या.

इतर खुल्या जागेवर दरी सारख्या खोल जागेवर जाण्याचा प्रयत्न करावा.
आणि वीज पडल्यास वज्राघात झाल्यास त्वरित रुग्णवाहिका किंवा वैद्यकीय मदत बोलवावी.

वज्राघात बाधित व्यक्तीस त्वरित वैद्यकीय मदत मिळवून द्यावी.
त्याला हात लावण्यास धोका नाही.
ओल्या व थंड परिस्थितीत बाधित व्यक्ती व जमिनीच्यामध्ये संरक्षणात्मक थर ठेवावा.

जेणेकरून हायपोथॅर्मीया शरीराचे अति कमी तापमानचा धोका कमी होईल.
शिवाय श्वसन बंद असल्यास तोंडावाटे पुनरुत्थान प्रक्रिया अवलंबावी.

हृदयाचे ठोके बंद असल्यास कुठलाही वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाच्या हृदयाची गती सीपीआर करून सुरू ठेवावी.

दरम्यान, आंघोळ करणे, हात धुणे, भांडी घासणे, कपडे धुणे हे कार्य सुद्धा करू नये.

अशी दक्षता घेतल्यास नक्कीच वीज कोसळून होणाऱ्या जीवितहानीच्या घटना आपण टाळू शकतो, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

वीज कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते त्यामुळे यावर दक्षता आणि काळजी घेणे हेच महत्त्वाचे ठरेल.

वीज कोसळून मृत्यू झालेल्याची आकडेवारी

२०२० : ०६ मृत्यू
२०१९ : ११ मृत्यू
२०१८ : ०२ मृत्यू
२०१७ : ३० मृत्यू
२०१६ : १५ मृत्यू
२०१५ : ०६ मृत्यू
२०१४ : २२ मृत्यू

१ एप्रिल २०२१ ते ९ जून २०२१ पर्यंत ९ व्यक्तीचा वीज पडल्याने मृत्यू झाला आहे.

पोलिसांसाठी खुशखबर ! मिळणार हक्काचं घर, पोलिसांसाठी विशेष गृहनिर्माण धोरण तयार करण्याला तत्त्वतः मंजुरी