आगामी दोन दिवसात राज्यात पावसाची शक्यता : हवामान खाते

नवी दिल्‍ली : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात (दि.28 ते दि. 30 मार्च) अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात उष्णतेची लाट देखील येवु शकते असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गेल्या दोन-चार दिवसांमध्ये तापमानात प्रचंड वाढ झाली आहे.

विदर्भ आणि मराठवाडयात सरासरीपेक्षा तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. राज्यातील इतर जिल्हयात तापमानाचा पारा 40 अंशावर जावुन पोहचला आहे. अमरावती येथे बुधवारी राज्यातील सर्वाधिक म्हणजेच 42.6 अंश डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झालेली आहे. मराठवाडयातील बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड आणि विदर्भातील अमरावती, अकोला, चंद्रपूर, यवतमाळ आणि वाशीम या जिल्हयांमध्ये बुधवारी तापमान 40 अंशावर गेले होते. त्यामुळे सद्यस्थितीत मध्य महाराष्ट्र आणि आसपासच्या जिल्हयात चक्रावात स्थिती निर्माण झाल्यामुळे आगामी दोन दिवसात काही ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे. दि. 28 ते दि. 30 दरम्यान पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like