Coronavirus : पावसाळयात कशी असणार ‘कोरोना’ची स्थिती, जाणून घ्या काय सांगतात तज्ञ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मान्सून भारतात पोहोचला असून हवामान खात्याने याची पुष्टी केली आहे. आता हे पाहायचे आहे की, कोरोनावर पावसाचा किती परिणाम होतो ? २०२० चा हा पावसाळा कोरोना व्हायरसला सोबत घेऊन जाईल की कोरोना विषाणूची ताकद आणखी वाढवेल ? काही तज्ञांनी याबाबत मत व्यक्त केले आहे. जाणून घेऊया ते काय म्हणतात…
युनिव्हर्सिटी ऑफ डेलवेयरच्या संसर्गजन्य रोग विभागातील शास्त्रज्ञ जेनिफर हॉर्न यांनी म्हटले आहे की, पावसाचे पाणी व्हायरसला नष्ट करू शकत नाही. यामुळे व्हायरसच्या प्रसाराची गतीही कमी होणार नाही. हे असेच आहे की, जर हात पाण्याने धुतले तर विषाणू मरणार नाही, साबण लावावा लागेल.
Onset of Southwest Monsoon over Kerala:
Southwest Monsoon set in over Kerala 2020 today, the 1st June, 2020 coinciding with its normal date. pic.twitter.com/JTwN5on6Yj— IMD Weather (@IMDWeather) June 1, 2020
अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील अप्लाइड फिजिक्सचे शास्त्रज्ञ जेर्ड इव्हान्स म्हणतात की, अद्याप हे समजलेले नाही कि पावसाळ्यात कोरोना विषाणूचा काय परिणाम होईल. मात्र, अनेक शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, पावसाच्या ओलाव्यामुळे व्हायरस तीव्र होतो.
पावसामुळे कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका वाढेल. पण वॉशिंग्टन विद्यापीठातील जागतिक आरोग्य, मेडिसिन आणि एपीडेमियॉलॉजीचे प्राध्यापक जेई बेटेन म्हणतात की, पाऊस कोरोना विषाणूला डायल्युट (सौम्य) करू शकतो. ज्याप्रमाणे पावसाच्या पाण्यामध्ये धूळ वाहून जाते, तसेच हा विषाणू देखील वाहून जाऊ शकतो.
तर काही तज्ञांचे मत आहे की, पाऊस साबणासारखा निर्जंतुकीकरण करण्यास सक्षम नाही. हे तसेच आहे की, हात पाण्याने धुतल्यास व्हायरस मरणार नाही, पण त्याला मारण्यासाठी आपल्या हाताला साबण लावावा लागेल.
मेरीलँड युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार, कोरोनाची अशीही प्रकरणे समोर आली आहेत ज्यात १७ दिवसानंतर बाहेरील भागावर कोरोना विषाणू आढळून आला आहे. अशात हे सांगणे कठीण आहे की पाऊस कोणत्याही पृष्ठभागात, जमीन किंवा खुर्चीवर असलेला विषाणू नष्ट होईल.
जगभरातील तज्ञ लोकांना पावसाळ्यात कोरोना विषाणू विषयी जास्त खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहेत. कारण आर्द्रतेमुळे कोरोना अधिक काळ हवेत तरंगू शकतो. यामुळे संक्रमणाचा धोका वेगाने वाढू शकतो.
From Time magazine / Experts: Corona infection can increase in rain, viruses intensify in https://t.co/Ybd27GgyaT #CoronaUpdates #coronavirus #TimesMagazine #Monsoon2020 #Rainfall
— Ritish Singh (@RitishRajput009) May 31, 2020