पुन्हा वातावरण बदलणार ! आगामी 24 तासात देशातील ‘या’ राज्यात होऊ शकतो मुसळधार ‘पाऊस’ अन् ‘गारपीठ’, अलर्ट जारी

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –  देशाच्या हवामानात सतत बदल होत आहेत. हरियाणा आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये चक्रीवादळाचे चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे हवामानात बदल दिसून येत आहे, तर भारतीय हवामान विभागाने देशातील काही राज्यांमध्ये हवामान संदर्भात इशारा दिला आहे.

हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस आणि बर्फ पडण्याची शक्यता

आयएमडीच्या म्हणण्यानुसार, हिमाचलमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान केंद्र शिमला ने मैदानी जिल्हे उना, बिलासपूर, हमीरपूर आणि कांगडा यासाठी येलो आणि मध्यम-उंच पर्वतीय क्षेत्रात शिमला, सोलन, सिरमौर, मंडी, कुल्लू, चंबा, किन्नौर आणि लाहौल स्पीति साठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, या दरम्यान मुसळधार पाऊस, बर्फवृष्टी, गारपीठ, मेघगर्जना आणि गडगडाटीचा इशारा देण्यात आला आहे. 2 एप्रिलपर्यंत राज्यात हवामान खराब राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

स्कायमेटने जारी केली चेतावणी

तर स्कायमेटनुसार जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, लडाख आणि उत्तराखंडमध्ये 31 मार्च ते 2 एप्रिल या काळात बर्‍याच ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. एक-दोन ठिकाणी हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पंजाब आणि हरियाणामधील उत्तर जिल्ह्यात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये 31 मार्चच्या संध्याकाळी किंवा रात्री एक वा दोन ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दिल्ली-एनसीआरमध्ये तापमानात होईल वाढ

यानंतर उत्तर मैदानामध्ये हवामान कोरडे होईल. त्याच बरोबर तापमान वाढणे सुरू होईल. आठवड्याच्या अखेरीस दिल्ली-एनसीआरमधील कमाल तापमान 35 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

येथेही मुसळधार पाऊस

तर त्याचवेळी भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे की, मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली-एनसीआर आणि उत्तर प्रदेशातही बर्‍याच भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीनुसार शाजापूर, उज्जैन, विदिशा, जबलपूर, खंडवा, खरगोन, मंडला, नरसिंगपूर, रायसेन, राजगड, सागर, सीहोर, सिवनी, बालाघाट, बैतूल, भोपाळ, छिंदवाडा, दमोह, देवास, धार, गुना, हरदा, होशंगाबाद, इंदूरमध्ये मुसळधार पाऊस पडेल.

पाऊस आणि गारपीठ होण्याची शक्यता

तर आज आणि उद्या राजस्थानात आणि महाराष्ट्रात गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, ललितपूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली इत्यादी जिल्ह्यांत पुढील 12 तासांत पाऊस आणि गारपीठ होऊ शकते.

You might also like