पुणे : पिंपरी चिंचवड शहरात पाऊसाची हजेरी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – अंगाची लाही लाही होत असताना आज सायंकाळी पाऊसाने हजेरी लावत जमिनीत गारवा निर्माण केला. पिंपरी चिंचवड शहरात पाऊसाने सुरुवात केली आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात तापमान 40 च्या वरती गेले होते. त्यातच पाऊसानही पाठ फिरवली होती. यामुळे अंगाची नुसती लाही लाही होत होती. रविवारी सायंकाळी आभाळ भरून आले होते, गरमी वाढली होती. विजांच्या कडकडासह पाऊसाने हजेरी लावली आहे. यामुळे तापलेल्या जमिनीत ओलावा निर्माण झाला आहे.

अचानक पाऊसाने हजेरी लावल्यामुळे अनेकजण पाऊसात अडकले. डांगे चौकात भरणाऱ्या आठवडे बाजारात भाजी विक्रेते आणि खरेदीसाठी आलेले नागरिक यांची तारांबळ उडाली. रस्त्याने जाणारे नागरिक, दुचाकीस्वार यांचीही चांगलीच तारांबळ उडाली. पाऊसही मोठा असल्याने हवेत आणि जमिनीत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे.