‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ यंत्रणा असेल तरच बांधकामांना ‘एनओसी’, केंद्र सरकारचे निर्देश

नवी दिल्ली : देशभरात अनेक राज्यांमध्ये यंदा दुष्काळाने डोके वर काढले. पावसाने ओढ दिली तर भूजलपातळीही खालावली. या पार्श्‍वभूमीवर आता केंद्र सरकारने कंबर कसली आहे.मार्गदर्शक तत्त्वांनुसार महापालिकांनी आपापल्या शहरात इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा असेल तरच एनओसी द्यावी. तसेच संबंधित इमारतींमध्ये अशा प्रकारची यंत्रणा राबवण्यात येत आहे की नाही हे तपासून पाहावे, असे निर्देशही केंद्र सरकारने दिले आहेत.

सध्या अनेक भागात चांगला पाऊस कोसळत आहे. परंतु, हे पाणी समुद्राला जाऊन वाया जाऊ नये म्हणून रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी विशेष विभाग स्थापन करण्याचे आदेश केंद्र सरकारने देशातल्या सर्व महापालिका आणि नगरपालिकांना दिले आहेत.केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालयाने पाणीबचतीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार संबंधित शहरातील पाणीसाठे पुनरुज्जीवित करण्याच्या दृष्टीने आणि भूजल पातळीकडे विशेष लक्ष देण्यासाठी विशेष विभाग स्थापन करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार केंद्र सरकारने देशातल्या सर्व महापालिका आणि नगरपालिकांना आदेश दिले आहेत.

दरम्यान, पाणीबचत करण्याबाबत किंवा रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा राबवण्याबाबत संबंधित शहरातील विशेष विभाग जबाबदार असेल, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.त्यासाठी महापालिकांनी आपापल्या शहरात इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा असेल तरच एनओसी द्यावी, असे निर्देश दिले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त-

‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य

‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

शरीराला ऊर्जा देणारी ‘खारीक’ ‘या’ आजारांनांही करते  दूर

You might also like