ब्रेकिंग : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत 22 जवान शहीद (व्हिडिओ)

वृत्तसंस्था – छत्तीसगडच्या सुकमा आणि बीजापूर बॉर्डरवर टेकलगुडा गावाच्या जवळ नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत तब्बल 22 जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. बीजापूरचे एसपी कामालोचन कश्यप यांनी 22 जवान शहीद झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे.

शनिवारी झालेल्या या चकमकीत 5 जवान शहीद झाल्याचे वृत्त यापुर्वी समोर आले होते. दरम्यान, चकमकीत 5 जवान शहीद झाले तर तब्बल 21 जवान बेपत्ता झाल्याचं सांगण्यात आलं होतं. बेपत्ता झालेल्या जवानांना शोधण्याचं काम चालु आहे. दरम्यानच बीजापूरचे एसपी कश्यप यांनी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत 22 जवान शहीद झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, झालेल्या चकमकीची दखल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली असून त्यांना दिल्लीतील केंद्रीय सुरक्षा यंत्रणेच्या वरिष्ठ घटनास्थळी जाण्यास सांगितले आहे.