Health News : कोणत्याही पसंतीच्या केंद्रावर निशुल्क बनणार आयुष्मान कार्ड, 1 मार्चपासून लागू होणार योजना

पोलीसनामा ऑनलाईन : आयुष्मान कार्ड योजना आता लागू असलेल्या राज्यातील कोणत्याही पसंतीच्या केंद्रांवर निशुल्क उपलब्ध होणार आहे. ही योजना 1 मार्च 2021 पासून लागू केली गेली आहे. आयुष्मान योजनेंतर्गत रूग्णालयात आरोग्य विमा कार्ड मोफत बनवले जात आहेत. केंद्रावर मिळणाऱ्या सुविधेत रेशनकार्ड आणि इतर कागदपत्रे दिल्यानंतर पीव्हीसी (पॉलीव्हिनायल क्लोराईड) आयुष्मान कार्ड बनवून दिले जाईल. आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि सामान्य सेवा केंद्र यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. छत्तीसगडशिवाय उत्तर प्रदेश, हरियाणा, त्रिपुरा, नागालँड, चंदीगड, पुडुचेरी, बिहार, मणिपूर आणि मध्य प्रदेशात ही योजना लागू करण्यात आली आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, नवीन प्रणाली अंतर्गत आयुष्मान भारत मधील लाभार्थ्यांना प्रथम पेपर-आधारित कार्ड दिले जातील. यानंतर पीव्हीसीचे छापील कार्ड दिले जाईल. पीव्हीसी आयुष्मान कार्ड कोणत्याही सामान्य सेवा केंद्रातून मिळू शकते. आरोग्य अधिकारी म्हणाले की, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत आरोग्य सुविधा व उपचार इत्यादी मिळविण्यासाठी आयुष्मान कार्ड असणे आवश्यक नसते, परंतु लाभार्थ्यांना चिन्हांकित करण्याची ही प्रक्रिया आहे. त्याचबरोबर, त्याच्या मदतीने आरोग्य सेवा पुरविण्यातील घोळ आणि फसवणूक थांबवावी लागेल.

काय आहे योजना ?
आयुषमान भारत, डॉ. खुशचंद बघेल आरोग्य विमा योजना, 16 सप्टेंबर 2018 पासून कार्यरत आहेत. योजनेंतर्गत केंद्राकडून 36,50,475 कुटुंबे ओळखली गेली आहेत. राज्यांकडून 19,20,555 कुटुंबे या योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. 8,71,143 बिगर कुटुंबांना राज्यांकडून योजनेंतर्गत सुविधा पुरविल्या जात आहेत. यात आरोग्य लाभ पॅकेजेसची संख्या 1,730 एवढी आहे. तर सरकारी रुग्णालयांसाठी राखीव संकुलांची संख्या 191 आहे. आयुष्मान भारत (डॉ. खुबचंद बघेल आरोग्य विमा) योजनेंतर्गत बीपीएल रेशनकार्ड लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा देण्यात येत आहेत. त्याचबरोबर एपीएल रेशनकार्डच्या लाभार्थ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा दिली जात आहे.