Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळं ‘या’ उपजिल्हाधिकारी महिलेनं पुढं ढकललं लग्न

पोलीसनामा ऑनलाईन टीम – देशभारात कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेऊन छत्तीसढ येथील रायपूरच्या उपजिल्हाधिकारी शीतल बन्सल यांनी त्यांचे लग्न पुढे ढकलले आहे. भारतीय वन विभागात काम करणारे अधिकारी आयुष आणि शीतल बन्सल यांचे लग्न आज होणार होते. मात्र. कोरोनामुळे लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. अशी माहिती उपजिल्हाधिकारी शीतल बन्सल यांनी दिली आहे.


आम्ही जर आज लग्न केलं तर समाजासमोर ते एक चुकीचा संदेश जाईल. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा धोका टाळण्यासाठी गर्दी न होऊ देणे सगळ्यांच्या हिताचे आहे. नेमक्या याच कारणामुळे आम्ही आमचे लग्न पुढे ढकलत आहोत, असे त्यांनी सांगितले.देशभरात 649 पेक्षा जास्त जणांना करोनाची लागण झाली आहे. काही जणांचा मृत्यूही झाला आहे. या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण देश लॉकडाउन आहे. लग्न समारंभही मोजक्या लोकांमध्ये आटपा किंवा लग्न पुढे ढकला असे आवाहन सरकारतर्फे आधीच करण्यात आले होते. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी लग्न पुढे ढकलून समाजापुढे आदर्श ठेवला आहे.