रायगड मतदारसंघात मोठी चुरस ; सध्या ‘हे’  उमेदवार केवळ ४०२९ मतांनी आघाडीवर  

रायगड : पोलीसनामा ऑनलाईन – रायगड लोकसभा मतदार संघात यावेळी चुरशीची लढत झाली. या मतदार संघात  शिवसेनेकडून अनंत गीते, वंचित बहुजन आघाडीकडून सुमन कोळी, राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे निवडणुकीच्या रिंगणात होते. सध्या (दुपारी १२:४७) हाती आलेल्या आकडेवारीनुसार शिवसेनेचे अनंत गीते  ४०२९ मतांनी आघाडीवर आहेत.  या मतदार संघात १६ लाख ५१ हजार ५६० मतदारांनी मतदान केले. त्यापैकी ६१.७७ टक्के मतदारांनी मतदान केले होते.

सकाळी  ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरवात झाली . सुरुवातीपासूनच मुख्य लढत असेल्या शिवसेनेचे अनंत गीते आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यात काटे की टक्कर सुरु आहे. सकाळच्या काही फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आघाडीवर होते. पण आता हाती आलेल्या आकडेवारीनुसार अनंत गीते  ४०२९ मतांनी आघाडीवर आहेत. या मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात अटीतटीचा सामना सुरु आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदार संघात शिवसेनेकडून काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. अनंत गीते आणि सुनील तटकरे यांच्या अटीतटीचा सामना झाला होता. शिवसेनेचे विद्यमान खासदार अनंत गीते यांनी २११० या अल्प मताधिक्याने निवडून आले  होते. आता यंदा देखील रायगड लोकसभा मतदार संघात पुन्हा या दोघांमध्ये लढत झाली.

मागील निडणुकीत शेकापने स्वतंत्र उभ्या केलेल्या उमेदवारामुळे गीतेंना लोकसभेची वाट सोपी झाली होती; परंतु शेकापचा लालबावटा आता तटकरेंच्या बाजूने उभा राहिल्याने गीतेंसमोर आव्हान उभे राहिल्याचे चित्र होते. रायगड लोकसभा मतदार संघामध्ये जातीच्या समीकरणाचा विचार केल्यास मराठा, कुणबी, आगरी, कोळी, माळी, दलित, मुस्लीम या समाज घटकांचा प्रामुख्याने प्रभाव आहे. या मतदार संघात जरी शिवसेनेचा खासदार असला तरी या मतदार संघामध्ये शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आल्याने त्यांचा चांगलाच दबदबा निर्माण झाला होता.