भारत करणार आर्टिफिशियल इन्टेलिजन्सवर मोठ्या जागतिक संमेलनाचं आयोजन, PM मोदी करणार उद्घाटन

नवी दिल्ली : इंटरनेट आधारित समाजात आर्टिफिशियल इन्टेलिजन्सला वीज आणि इंटरनेटसारखीच एक मोठी झेप मानले जात आहे. तर कोरोना संकटाने आर्टिफिशियल इन्टेलिजन्सच्या गरजांना नवीन संदर्भ दिले आहेत. अशावेळी भारत पुढील आठवड्यात आर्टिफिशियल इन्टेलिजन्सबाबत एक मोठे जागतिक संमेलन आयोजित करत आहे. ’रेज 2020’ नावाच्या या संमेलनाचे उद्घाटन पीएम नरेंद्र मोदी करतील.

रिस्पॉन्सिबल एआय फॉर सोशल एम्पाव्हर्मेंट (रेज 2020) चे आयोजन 5-7 ऑक्टोबरला करण्यात येईल. यादरम्यान आर्टिफिशियल इन्टेलिजन्सवर काम करणारे दिग्गज, आरोग्य, कृषी, शिक्षण आणि स्मार्ट मोबिलिटीसह अन्य अनेक क्षेत्रात सामाजिक सशक्तीकरण, समावेश आणि परिवर्तनासाठी एआयच्या वापरावर चर्चा करतील. जागतिक बैठकीला सरकारी प्रतिनिधी आणि शिक्षकांशिवाय तंत्रज्ञान तज्ज्ञ येतील. आर्टिफिशियल इन्टेलिजन्स आणि संबंधित क्षेत्रांमध्ये काम करणारे काही रोचक स्टार्ट-अपसुद्धा सहभागी होतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते की, ते आर्टिफिशियल इन्टेलिजन्सकडे भारतात सामाजिक समानता आणि गरीबी निर्मुलनासाठी प्रभावी साधन म्हणून पहातात. मागील वर्षी एका पुस्ताकच्या प्रकाशन कार्यक्रमात पंतप्रधानांनी वक्तव्य केले होते कि, तंत्रज्ञानाबाबत घाबरण्याची गरज नाही कारण हा एक पूल आहे जो लांकाना तोडत नाहीत तर जोडतो. नेहमी तंत्रज्ञानबाबत भिती दाखवली जाते. जर मानवाचा हेतू चांगला असेल, तर आर्टिफिशियल इन्टेलिजन्स देशासाठी समृद्धीचे दरवाजे उघडू शकते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like